प्रत्येक व्यक्तीसाठी फॅमिली ही खूप महत्त्वाची असते. आपल्या फॅमिलीवर प्रत्येकजण जिवापेक्षाही जास्त प्रेम करतात. फॅमिलीविषयीचे हे प्रेम व्यक्त करणे मात्र ठराविक लोकांनाच जमते. असेच फॅमिलीविषयीचे प्रेम अभिनेत्री स्पृहा जोशी हिने सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. हाृहाने नुकताच आपल्या फॅमिलीसोबत एक झक्कास फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तिच्या या फोटोमध्ये बहीण, आई आणि वडील दिसत आहेत. त्यांचा हा फोटो पाहता, खरंच हॅप्पी फॅमिली, असे शब्द नकळतपणे बाहेर पडतील, यात शंकाच नाही. या फोटोबरोबरच स्पृहाने एक पोस्टदेखील शेअर केली आहे. फॅमिली ही माझ्यासाठी खूपच खास गिफ्ट असल्याचे तिने या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. तिच्या या फॅमिली फोटोला सोशल मीडियावर भरभरून लाइक्स मिळत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}