Join us

फॅमिलीला अक्षय देणार ‘हे’ स्पेशल दिवाळी गिफ्ट!

By admin | Updated: October 20, 2016 02:19 IST

अक्षय कुमार कितीही व्यस्त असला तरी कुटुंबासाठी आवर्जून वेळ काढतो.

अक्षय कुमार कितीही व्यस्त असला तरी कुटुंबासाठी आवर्जून वेळ काढतो. पत्नी ट्िवंकल आणि मुले आरव आणि नितारा यांच्या आनंदासाठी तो सतत धडपडत असतो. आता हेच पाहा ना! दिवाळी तोंडावर आहे आणि दिवाळीनिमित्त अक्षय कुटुंबीयांना देणार असलेले गिफ्टही तयार आहे. होय, यंदाच्या दिवाळीत अक्षय फॅमिलीला स्पेशल दिवाळी गिफ्ट देणार आहे. ते गिफ्ट म्हणजे केपटाऊन ट्रिप. होय, दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे दिवाळी सेलिब्रेट करण्याचा प्लॅन अक्षयने आखला आहे. गतवर्षी त्याने जुहू येथील त्याच्या बंगल्यावर जवळच्या मित्रांसोबत दिवाळी साजरी केली होती. यावर्षी मात्र काही तरी ‘थरारक’ करण्याचा त्याचा विचार आहे. केप टाऊनमध्ये अक्षयने अनेक चित्रपटांचे शूटिंग केले आहे. हे शहर त्याला मनापासून आवडते. केपटाऊन त्याला त्याचे दुसरे घर वाटते.