आदित्य धरचं दिग्दर्शन असलेला 'धुरंधर' सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमात अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैत या भूमिकेलाही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. 'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी अक्षय खन्नाचं कौतुकही झालं. तर त्याचे सिनेमातील काही सीन्सही व्हायरल झाले होते. अक्षय खन्नाआधी रहमान डकैतची ही भूमिका साऊथ सुपरस्टार नागार्जुनला ऑफर झाल्याची चर्चा सुरू होती. यावर आता नागार्जुन यांनी मौन सोडत प्रतिक्रिया देत खरं काय ते सांगितलं आहे.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुन यांनी 'धुरंधर'मधील रहमान डकैतच्या भूमिकेबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं. रहमान डकैतच्या भूमिकेसाठी मला कधीच विचारणा झाली नाही, असं नागार्जुन यांनी स्पष्ट करत अफवांना पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, "मला कधीच रहमान डकैतची भूमिका ऑफर झाली नव्हती. पण झाली असती तर मला आवडलं असंतं. 'धुरंधर' हा एक उत्तम सिनेमा आहे. आदित्य धरने उत्कृष्टरित्या दिग्दर्शन केलं आहे. त्याचा उरी सिनेमाही मला आवडला होता. प्रत्येकानेच 'धुरंधर' सिनेमात चांगला अभिनय केला आहे. आणि अक्षय खन्नाने तर कमाल केली. मी सीक्वेलची प्रतिक्षा करत आहे. हा सिनेमादेखील ब्लॉकबस्टर व्हावा यासाठी त्यांना शुभेच्छा".
'धुरंधर' सिनेमातून पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेर हमझा अली मदारीची कहाणी दाखवण्यात आली आहे. ज्याची भूमिका अभिनेता रणवीर सिंगने साकारली आहे. या सिनेमात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, सारा अर्जुन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन यांच्या मुख्य भूमिका आहे. येत्या मार्च महिन्यात 'धुरंधर'चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Web Summary : Nagarjuna denied being offered Akshay Khanna's role in 'Dhurandhar', praising the film and Khanna's performance. He awaits the sequel.
Web Summary : नागार्जुन ने 'धुरंधर' में अक्षय खन्ना की भूमिका की पेशकश से इनकार किया, फिल्म और खन्ना के प्रदर्शन की प्रशंसा की। वह सीक्वल का इंतजार कर रहे हैं।