Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर थलपति विजय तृषा क्रिष्णनशी करणार लग्न? अभिनेत्रीच्या आईनेच दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 17:02 IST

घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच थलपति विजय आणि तृषा एका लग्नात एकत्र दिसले होते. आता पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर थलपति विजय तृषाशी लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

साऊथ स्टार थलपति विजय त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. थलपति विजयची पत्नी संगीताने त्याच्यावर एक्स्ट्रा मरेटिअल अफेअरचे आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांचा २७ वर्षांचा संसार मोडणार आहे. थलपति विजयचं नाव साऊथ ब्युटी तृषा क्रिष्णनसोबत जोडलं जात आहे. घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच थलपति विजय आणि तृषा एका लग्नात एकत्र दिसले होते. आता पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर थलपति विजय तृषाशी लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

तृषासोबत लग्न करून थलपति विजय त्यांचं रिलेशनशिप ऑफिशियल करणार असल्याचं बोललं जात आहे. पहिली पत्नी संगीताला घटस्फोट दिल्यानंतर थलपति विजय तृषाशी लग्न करणार असल्याची एक पोस्ट सध्या व्हायरल होते आहे. यामध्ये थलपति विजय आणि तृषा लग्न करणार असल्याचं म्हटलं गेलं आहे. निवडणुकीनंतर ते दोघे लग्न करणार असल्याचंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर फिरणारी ही पोस्ट तृषाच्या आईने लाइक केली आहे. त्यामुळे थलपति विजय आणि तृषा क्रिष्णन लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

दरम्यान, थलपति विजय आणि संगीता यांनी १९९९ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत.  थलपति विजयने अभिनयातून संन्यास घेतला असून आता तो पूर्णवेळ राजकारणात सक्रिय झाला आहे. थलपति विजय आणि तृषाने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांचं अफेअर सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thalapathy Vijay to Marry Trisha After Divorce? Actress's Mother Hints

Web Summary : Rumors swirl that Thalapathy Vijay will marry Trisha Krishnan after divorcing his wife, Sangeeta, following alleged extramarital affairs. A liked social media post by Trisha's mother fuels speculation after they were spotted together. Vijay is now focusing on politics after retiring from acting.
टॅग्स :सेलिब्रिटी