सध्या मनोरंजन विश्वात एका जोडीच्या लगीनघाईची चांगलीच चर्चा आहे. ही जोडी म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. हे दोघे पुढील काही तासांत राजस्थानमधील उदयपूर येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूरमध्ये राजेशाही थाटात त्यांच्या प्री-वेडिंग विधींना सुरुवात झाली आहे.
विजय आणि रश्मिकाच्या लग्नाचा मुहूर्त २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता निश्चित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न तेलुगू आणि कोडावा (Kodava) या दोन्ही संस्कृतींच्या रीतिरिवाजांनुसार पार पडणार आहे. तर बुधवारी (आज) हळद आणि मेहंदी समारंभ पार पडतील, ज्यामध्ये केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी होतील.
पंडितजी उदयपूरमध्ये दाखल!लग्नाचे विधी पार पाडण्यासाठी पंडितजी उदयपूर विमानतळावर पोहोचले आहेत. पापाराझींनी त्यांना विचारले असता, त्यांनी रश्मिका आणि विजयचे लग्न लावण्यासाठी आलो असल्याचे मान्य केले. "आम्ही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलो आहोत", असे म्हणत त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
पंतप्रधान मोदींचे खास पत्रविजय आणि रश्मिकाच्या लग्नात अनेक दिग्गजांची हजेरी असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण धाडण्यात आले होते. पंतप्रधान स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत, मात्र त्यांनी विजयचे आई-वडील गोवर्धन राव आणि माधवी यांना एक खास शुभेच्छा पत्र पाठवून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले आहेत.
Web Summary : Vijay Deverakonda and Rashmika Mandanna will reportedly marry in Udaipur on February 26th. Pre-wedding rituals have begun. The ceremony will blend Telugu and Kodava traditions. Priests have arrived, confirming their role in the wedding.
Web Summary : विजय देवरकोंडा और रश्मिका मंदाना कथित तौर पर 26 फरवरी को उदयपुर में शादी करेंगे। शादी से पहले की रस्में शुरू हो चुकी हैं। समारोह में तेलुगु और कोडावा परंपराओं का मिश्रण होगा। पंडितों ने शादी में अपनी भूमिका की पुष्टि की है।