Join us
Daily Top 2Weekly Top 5

"लोक मला विचारायचे वहिनी कशी आहे?", 'विरोश'च्या लग्नानंतर विजय देवराकोंडाच्या भावाची पोस्ट, म्हणाला- "मला वहिनी म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 08:39 IST

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल गुरुवारी(२६ फेब्रुवारी) लग्नाच्या बेडीत अडकले. उदयपूरमध्ये रश्मिका आणि विजयचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर विजय देवराकोंडाचा भाऊ आनंद याने पोस्ट शेअर केली आहे. 

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding: रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल गुरुवारी(२६ फेब्रुवारी) लग्नाच्या बेडीत अडकले. उदयपूरमध्ये रश्मिका आणि विजयचा शाही विवाहसोहळा पार पडला. पारंपरिक पद्धतीने त्यांनी लग्नगाठ बांधली. विरोशच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर विजय देवराकोंडाचा भाऊ आनंद याने पोस्ट शेअर केली आहे. 

आनंदने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. पोस्टमधून त्याने रश्मिका-विजयला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "अनेकदा चाहते विचारायचे वहिनी कशी आहे? त्यांना काय उत्तर द्यायचं हे मला समजायचं नाही. आज माझ्या भावाचं लग्न झालं आणि मला एक सकारात्मक आणि दयाळू व्यक्ती वहिनी म्हणून भेटली. आयुष्यभर त्यांनी असंच हसत राहावं अशी प्रार्थना मी करतो. आयुष्यभरासाठी एकत्र", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी त्यांनी गुपचूप साखरपुडाही केला होता. काही दिवसांपूर्वीच रश्मिका आणि विजयने सोशल मीडियावरुन प्रेमाची कबुली देत त्यांचं नातं ऑफिशियल केलं होतं. आता लग्नबंधनात अडकत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ४ मार्चला हैदराबादमध्ये त्यांचं वेडिंग रिसेप्शन आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Brother's post after 'ViRosh' wedding: 'People asked about sister-in-law'

Web Summary : Rashmika Mandanna and Vijay Deverakonda tied the knot in Udaipur. Vijay's brother, Anand, shared photos and a heartfelt message, expressing joy at gaining Rashmika as his sister-in-law. He wished them a lifetime of happiness together. A reception will be held in Hyderabad.
टॅग्स :विजय देवरकोंडारश्मिका मंदानासेलिब्रेटी वेडिंग