Vijay Deverakonda Rashmika Mandanna First Appearance After Wedding : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा काल २६ फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. नवविवाहित जोडपे आज शुक्रवारी उदयपूर विमानतळावर स्पॉट झाले. यादरम्यान विजय आणि रश्मिका एकमेकांचा हात पकडून चालताना दिसले. या जोडप्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नानंतर रश्मिका आणि विजय हैदराबादकडे रवाना होण्यासाठी उदयपूर विमानतळावर पोहचले. यावेळी विमानतळावर पापाराझींना बघून विजय, रश्मिकानं हसत नमस्कार केला, तसेच चाहत्यांनाही अभिवादन केलं. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोघेही एकत्र छान दिसत आहेत आणि पापाराझींसमोर हसत आणि एकमेकांचा हात धरून पोज देताना दिसत आहेत.
नववधू रश्मिका ही आकर्षक गडद लाल रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिनं परिधान केलेल्या ड्रेसवर विशेषतः गळ्याभोवती आणि ओढणीच्या काठांवर सोनेरी रंगाचे नाजूक आणि आकर्षक भरतकाम केलेले दिसलं. तिच्या भांगेत सिंदूरही पाहायला मिळाला. तर विजयने फिकट रंगाच्या कुर्ता आणि त्यासोबत मॅचिंग पायजमामध्ये देखणा दिसतोय. शाही विवाह सोहळ्यानंतर विजय आणि रश्मिकाला पाहून चाहतेही खूश झालेत.
हैदराबादमध्ये ग्रँड रिसेप्शनउदयपूरमधील 'आयटीसी मेमेंटोज' या आलिशान रिसॉर्टवर लग्नाच्या विधींना मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी क्रिकेट सामना आणि संगीत समारंभाने सुरुवात झाली. त्यानंतर बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी हळदी आणि मेहंदी समारंभ झाला. अखेर २६ फेब्रुवारी रोजी सकाळी तेलुगू आणि संध्याकाळी कोडावा अशा दोन परंपरांमध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली. हे लग्न अत्यंत खाजगी स्वरूपाचे होते. अत्यंत साध्या पद्धतीनं, शांततेत हा विवाह सोहळा पार पडला. आता लग्नानंतर विजय आणि रश्मिका हैदराबादमध्ये ४ मार्च रोजी ग्रँड रिसेप्शन देणार आहेत.
Web Summary : Newlyweds Vijay Deverakonda and Rashmika Mandanna were spotted at Udaipur airport after their private wedding ceremony. The couple greeted paparazzi and fans with smiles and flying kisses. A grand reception is planned in Hyderabad on March 4th.
Web Summary : अपनी निजी शादी के बाद नवविवाहित विजय देवरकोंडा और रश्मिका मंदाना को उदयपुर हवाई अड्डे पर देखा गया। जोड़े ने मुस्कुराते हुए और फ्लाइंग किस के साथ पैपराजी और प्रशंसकों का अभिवादन किया। 4 मार्च को हैदराबाद में एक भव्य रिसेप्शन की योजना है।