Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात लाडकं जोडपं विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना म्हणजेच चाहत्यांचे लाडके 'विरोश' सध्या त्यांच्या शाही विवाहसोहळ्यामुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. यातच आता विजय हा रश्मिकाला नेमक्या कोणत्या टोपणनावाने (Pet Name) हाक मारतो, याची माहिती समोर आली आहे.
प्रत्येक कपल एकमेकांना प्रेमाने कोणत्या ना कोणत्या नावाने हाक मारत असतं. विजय आणि रश्मिकाच्या बाबतीतही असंच काहीसं आहे. ॲनिमल चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान Unstoppable with NBK 2 या टॉकमध्ये सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण आणि रणबीर कपूर यांनी रश्मिकाला विजय देवरकोंडा याला फोन लावण्यास भाग पाडले होते. रश्मिका जशी 'हॅलो' म्हणते, तसा पलीकडून विजयचा आवाज येतो. तो तिला नेहमीप्रमाणे 'हॅलो' न म्हणता थेट "व्हॉट्स अप रे..." (What's up Re...) असं म्हणतो. अर्थात विजय रश्मिकाला प्रेमाने 'रे' अशी हाक मारतो.
मैत्रीतून लग्नापर्यंतचा प्रवासविजय आणि रश्मिकाने नेहमीच एकमेकांचा उल्लेख 'बेस्ट फ्रेंड' असा केला आहे. विजयने त्याच्या लग्नाच्या पोस्टमध्येही म्हटले होते की, "माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला मी आज बायको बनवलंय". सध्या उदयपूरमध्ये रंगलेल्या या विवाहसोहळ्यानंतर विजय आणि रश्मिकाच्या अशाच अनेक जुन्या आठवणींना चाहते उजाळा देत आहेत.
Web Summary : Vijay Deverakonda lovingly calls Rashmika Mandanna 'Re'. The revelation came during a talk show when Rashmika called Vijay, and he greeted her with 'What's up Re...'. The couple, often referred to as 'ViRosh,' continue to charm fans with their bond.
Web Summary : विजय देवरकोंडा रश्मिका मंदाना को प्यार से 'रे' कहकर बुलाते हैं। यह खुलासा एक टॉक शो के दौरान हुआ जब रश्मिका ने विजय को फोन किया, और उन्होंने 'क्या हो रहा है रे...' कहकर अभिवादन किया। 'विरोष' कहे जाने वाले यह जोड़ा अपने बंधन से प्रशंसकों को मोहित कर रहा है।