Varanasi Release Date : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आगामी भव्य चित्रपट 'वाराणसी' सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. सुपरस्टार महेश बाबू, ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा जोनास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ७ एप्रिल २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे. याबद्दल खुद्द प्रियंका चोप्रानं पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
७ एप्रिल २०२७ या तारखेचे विशेष महत्त्व म्हणजे गुढीपाडवा आणि उगादी असल्यानं हा काळ महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात सणासुदीचा असतो, ज्यामुळे थिएटरमध्ये मोठी गर्दी अपेक्षित आहे. रिलीजच्या पुढच्याच आठवड्यात येणाऱ्या आंबेडकर जयंती आणि रामनवमीच्या सुट्ट्यांमुळे चित्रपटाला लॉंग विकेंडचा मोठा फायदा मिळू शकतो.
'वाराणसी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रियंका चोप्रा कमबॅक करत आहे. महेश बाबू आणि राजामौली यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. दरम्यान, 'वाराणसी' चित्रपटाचा काही महत्त्वाचा भाग अयोध्येतील राम मंदिरात आणि आसपासच्या परिसरात चित्रित करण्याचा विचार राजामौली हे करत आहेत. यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. राजामौलींच्या चित्रपटात नेहमीच भव्यता असते, त्यामुळे अयोध्येतील चित्रीकरण हा चित्रपटाचा मुख्य आकर्षण बिंदू ठरू शकतो.
Web Summary : SS Rajamouli's 'Varanasi', starring Mahesh Babu and Priyanka Chopra, may release April 7, 2027. Billboards in Varanasi suggest the date. The film is expected to be a big project, capitalizing on festival holidays. Priyanka Chopra makes her comeback with this film.
Web Summary : एसएस राजामौली की 'वाराणसी', जिसमें महेश बाबू और प्रियंका चोपड़ा हैं, 7 अप्रैल, 2027 को रिलीज हो सकती है। वाराणसी में बिलबोर्ड्स से तारीख का पता चलता है। फिल्म त्योहारों की छुट्टियों का फायदा उठाएगी। प्रियंका चोपड़ा इस फिल्म से वापसी कर रही हैं।