Us-iran Conflict Ajith Kumar Stuck In Dubai :अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा मोठा फटका आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला बसला आहे. या तणावपूर्ण वातावरणामुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली असून, यात साऊथचा दिग्गज अभिनेता अजित कुमार (Ajith Kumar) अडकल्याची माहिती समोर आली आहे. ईशा गुप्ता आणि सोनल चौहान यांच्यानंतर आता अजित कुमारलाही संयुक्त अरब अमिरातीमध्येच थांबावे लागले आहे.
अजित कुमार आपल्या कामाचे नियोजन पूर्ण करून चेन्नईला परतण्यासाठी निघाला होता. मात्र, युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईहून होणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आल्याने त्याला विमानतळावरूनच माघारी फिरावे लागले. या वृत्तामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र अभिनेत्याच्या मॅनेजरने काल १ मार्च रोजी 'झूम'शी बोलताना महत्त्वाची अपडेट दिली आहे.
"अजित कुमार भारतात येण्यासाठी निघाले होते, पण विमानतळ बंद असल्याने त्यांना परत यावे लागले. सध्या ते दुबईमध्ये पूर्णपणे सुरक्षित असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. हवाई सेवा पुन्हा सुरू होताच ते मायदेशी परततील", असे मॅनेजरने स्पष्ट केले.
दुबईत काय करत होता अभिनेता?अजित कुमारला अभिनयासोबतच रेसिंगची प्रचंड आवड आहे. तो केवळ छंद म्हणून नव्हे, तर व्यावसायिक स्तरावर रेसिंगमध्ये सक्रिय असतो. त्याने २०२५ मधील '24H Dubai' या शर्यतीत उल्लेखनीय कामगिरी केली होती. याच रेसिंग संदर्भात दुबई आणि अबू धाबीमध्ये विशेष प्रशिक्षणासाठी तो गेला होता. मात्र, अचानक उद्भवलेल्या आंतरराष्ट्रीय संकटामुळे त्याचे परतणे लांबणीवर पडले आहे.
Web Summary : Actor Ajith Kumar is stuck in Dubai due to flight cancellations amid Iran-Israel tensions. He was there for racing training, and is currently safe, according to his manager. Flights will resume when safe for travel.
Web Summary : ईरान-इजरायल तनाव के बीच उड़ानें रद्द होने से अभिनेता अजित कुमार दुबई में फंस गए हैं। वह रेसिंग प्रशिक्षण के लिए वहां थे, और उनके प्रबंधक के अनुसार, वे वर्तमान में सुरक्षित हैं। यात्रा के लिए सुरक्षित होने पर उड़ानें फिर से शुरू होंगी।