थलपती विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात जास्त चर्चा झाली तीअभिनेत्री तृषा कृष्णनची. या सोहळ्यात अभिनेत्री तृषाने आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या आकाशी रंगाच्या सिल्क साडीची आणि सौंदर्याची सर्वांना भुरळ पडली. अशातच तृषाच्या या साडीचं थेट अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनशी कनेक्शन समोर आलंय. नेटकऱ्यांनी ही खास गोष्ट शोधून काढलीये. जाणून घ्या सविस्तर
ऐश्वर्या रायच्या 'आयकॉनिक' लूकशी तुलना
सोशल मीडियावर तृषाच्या या साडीतील फोटोंची तुलना थेट ऐश्वर्या राय बच्चन हिच्या २००० सालातील एका प्रसिद्ध लूकशी केली जात आहे. ऐश्वर्याने जेव्हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली होती, तेव्हा तिने अशाच निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तृषाचं साधेपणात दडलेलं सौंदर्य, केसांमधील गजरा आणि पारंपरिक दागिने पाहून चाहत्यांना २६ वर्षांपूर्वीच्या ऐश्वर्याच्या त्या फोटोंची आठवण झाली.
नंदिनी आणि कुंदवईचे कनेक्शन
या दोन अभिनेत्रींच्या लूकची तुलना करतानाच, चाहत्यांनी मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन' चित्रपटाचा संदर्भही जोडला आहे. एका युजरने दोन्ही अभिनेत्रींचे फोटो शेअर करत 'नंदिनी आणि कुंदवई' असे कॅप्शन दिले आहे. या चित्रपटात ऐश्वर्याने 'नंदिनी' तर तृषाने 'कुंदवई' ही महत्त्वाची भूमिका साकारली होती.
तमिळनाडू राजकारणात नवा इतिहास
१० मे रोजी थलपती विजयने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तमिळनाडूच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात केली. गेल्या सहा दशकांपासून डीएमके (DMK) आणि एआयएडीएमके (AIADMK) या दोन्ही पक्षांचे वर्चस्व मोडून काढत विजयने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या सोहळ्याला राजकीय नेत्यांसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.
चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यात तृषा अत्यंत साध्या आणि मोहक अवतारात दिसली. यावेळी तिने विजयच्या आईची भेट घेऊन त्यांना मिठी मारली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोहळा संपल्यानंतर जेव्हा ती बाहेर पडली, तेव्हा तिच्या चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
Web Summary : Trisha Krishnan's saree at Vijay's swearing-in drew attention, sparking comparisons to Aishwarya Rai's iconic 2000 look. Fans noted similarities in their blue sarees and traditional styling, also referencing their roles in 'Ponniyin Selvan'.
Web Summary : विजय के शपथ ग्रहण समारोह में तृषा कृष्णन की साड़ी ने ध्यान खींचा, जिसकी तुलना ऐश्वर्या राय के प्रतिष्ठित 2000 के लुक से की गई। प्रशंसकों ने नीली साड़ियों और पारंपरिक स्टाइल में समानताएं देखीं, साथ ही 'पोन्नियिन सेल्वन' में उनकी भूमिकाओं का भी उल्लेख किया।