Join us
Daily Top 2Weekly Top 5

तृषा कृष्णनचा 'तो' एकमेव बॉलिवूड चित्रपट; बॉक्स ऑफिसवर आपटला, पण आज आहे 'कल्ट क्लासिक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 09:38 IST

अभिनेत्री तृषा कृष्णन सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे.

तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री तृषा कृष्णन सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सलग हिट चित्रपट देणाऱ्या तृषाने बॉलिवूडमध्येही नशीब आजमावले होते. जरी तिने हिंदीत केवळ एकच चित्रपट केला असला, तरी आज तो चित्रपट सोशल मीडिया आणि टीव्हीवर 'कल्ट क्लासिक' म्हणून ओळखला जातो.

२०१० मध्ये प्रदर्शित झालेला 'खट्टा मीठा' हा तृषा कृष्णनचा पहिला आणि एकमेव बॉलिवूड चित्रपट होता. दिग्गज दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी या राजकीय-विनोदी नाट्याचे (Political-Comedy) दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात तृषाने खिलाडी अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केली होती. अक्षय आणि तृषा यांच्यातील 'गोड-कडू' नात्याला आणि त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी पसंती दिली होती.


बॉक्स ऑफिसवर सरासरी, पण टीव्हीवर सुपरहिट!

'खट्टा मीठा' जेव्हा सिनेमागृहात प्रदर्शित झाला, तेव्हा बॉक्स ऑफिसवर त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. चित्रपट सरासरी कामगिरी करून विस्मरणात जाईल असे वाटत असतानाच टीव्हीवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला. सचिन टिचकुले (अक्षय कुमार) या संघर्षशील कंत्राटदाराची कथा आणि त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या (तृषा कृष्णन) भूमिकेतील संघर्षाने प्रेक्षकांची मने जिंकली.

'खट्टा मीठा' हा चित्रपट प्रियदर्शन यांच्याच १९८८ सालच्या 'वेल्लनकलुडे नाडू' या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. जगभरात या चित्रपटाने ६० कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. राजपाल यादव, मकरंद देशपांडे, मिलिंद गुणाजी, अरुणा इराणी आणि मनोज जोशी अशा दिग्गज कलाकारांनी यात भूमिका केल्या आहेत. बॉलिवूडमध्ये फारसे न रमता तृषा पुन्हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळली आणि तिथे तिने यशाची शिखरे सर केली. अलीकडेच थलापती विजयसोबतचा तिचा 'लिओ' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता तृषा तिच्या आगामी 'करुप्पू' या चित्रपटामुळे चर्चेत असून हा चित्रपट १४ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trisha Krishnan's sole Bollywood film: Flop at box office, cult classic now.

Web Summary : Trisha Krishnan's only Bollywood venture, 'Khatta Meetha,' failed at the box office but later gained cult classic status on TV. Despite average performance initially, the film resonated with audiences due to its story and the chemistry between Trisha and Akshay Kumar.
टॅग्स :सेलिब्रिटीअक्षय कुमार