'कांतारा अ लिजेंड चॅप्टर १' ( Kantara A Legend Chapter 1 Movie) रिलीज होताच केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर प्रेक्षकांच्या मनावरही राज्य करत आहे. या चित्रपटाने एका आठवड्यातच उत्कृष्ट व्यवसाय केला आहे आणि यशाची ही मालिका अजूनही थांबताना दिसत नाहीये. 'कांतारा चॅप्टर १'ला 'कांतारा' पेक्षाही जास्ती पसंती मिळत आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'कांतारा'चा प्रीक्वल आहे आणि यातील प्रत्येक सीन इतका दमदार आहे की लोक त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. चित्रपटाची कथा, पात्रे आणि व्हीएफएक्स खूपच उत्कृष्ट पद्धतीने पडद्यावर मांडले गेले आहेत. याच कारणामुळे चित्रपट यशाच्या शिखरावर पोहोचत आहे.
'कांतारा चॅप्टर १'ने आपले बजेट वसूल केले आहे आणि आता तो केवळ नफ्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चित्रपटाच्या या जबरदस्त कमाई आणि यशाबद्दल अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने नुकत्याच एका कार्यक्रमात चर्चा केली. त्याने 'कांतारा चॅप्टर १'च्या यशामागचे सीक्रेट सांगितले. तो म्हणाला की, "मागील भागापासून ते या भागापर्यंत, आम्ही चित्रपटाला अधिक दृश्यात्मक रूप दिले आहे. मी आधीही म्हटले आहे की, आम्ही जितके जास्त प्रादेशिक होऊ, तितकेच जास्त जागतिक बनू आणि अगदी तसेच घडले आहे."
'कांतारा चॅप्टर १'च्या सक्सेस इव्हेंटमध्ये ऋषभ शेट्टी पुढे म्हणाला की, "हा चित्रपट आणि हे पात्र माझे स्वप्न होते, जे माझ्या टीमने आपले मानले आणि आता हे जनतेचे स्वप्न बनले आहे. माझी ऊर्जा प्रेक्षकांमध्ये हस्तांतरित झाली आहे."
'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन'कांतारा चॅप्टर १' सध्या देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. सुमारे ६१ कोटी रुपयांनी खातं उघडणाऱ्या या चित्रपटाने केवळ सात दिवसांत भारतात ३१६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. विकेंड नसता नाही, बुधवारी चित्रपटाचे कलेक्शन २५ कोटी रुपये होते. यापूर्वी चित्रपटाने सुमारे ३५ कोटी कमावले होते. आता विकेंडला कमाईत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
Web Summary : 'Kantara Chapter 1' triumphs, surpassing its prequel's popularity. Rishab Shetty credits regional authenticity and audience connection for the film's blockbuster success, earning ₹316 crore in India within a week.
Web Summary : 'कांतारा चैप्टर 1' की धूम, प्रीक्वल से भी ज्यादा पसंद। ऋषभ शेट्टी ने क्षेत्रीय प्रामाणिकता और दर्शकों के जुड़ाव को फिल्म की सफलता का श्रेय दिया, भारत में एक सप्ताह में ₹316 करोड़ कमाए।