साऊथ सिनेइंडस्ट्रीतला सुपरस्टार प्रभासचा 'द राजा साब' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभास आजवर कधीही न पाहिलेल्या हटके अंदाजात दिसला आहे. अवाढव्य बजेटमध्ये तयार झालेल्या या हॉरर-कॉमेडी चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. थिएटरमधील या थंड प्रतिसादामुळे निर्मात्यांनी आता आपला मोर्चा ओटीटीकडे वळवला असून, चित्रपट लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
मोठी स्टारकास्ट आणि प्रभासचा जबरदस्त लूक असूनही या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळवता आली नाही. रिलीजच्या दुसऱ्या दिवसापासूनच कमाईत मोठी घट झाली. पहिल्या आठवड्यात पेड प्रिव्ह्यूसह १०८ कोटींची कमाई केल्यानंतर, १० दिवसांत या चित्रपटाने देशांतर्गत बाजारात केवळ १३९.०१ कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाचे बजेट पाहता ही आकडेवारी चिंताजनक मानली जात आहे.
कधी आणि कुठे होणार ओटीटी रिलीज?मिळालेल्या माहितीनुसार, 'द राजा साब'चे डिजिटल स्ट्रीमिंग हक्क 'जिओहॉटस्टार'कडे आहेत. रिपोर्टनुसार निर्माते हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ किंवा ६ मार्च २०२६ च्या सुमारास ओटीटीवर प्रदर्शित करू शकतात. थिएटरमधील तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय लवकर घेतला जाण्याची शक्यता आहे, मात्र अधिकृत घोषणा अद्याप प्रलंबित आहे. मारुती दिग्दर्शित या चित्रपटात प्रभाससोबत संजय दत्त, निधी अग्रवाल, मालविका मोहनन आणि रिद्धी कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Web Summary : Prabhas' 'The Raja Saab,' a horror-comedy, underperformed in theaters. Digital rights are with JioHotstar. OTT release is expected around February 27th or March 6th, 2026 to recover losses. An official announcement is awaited.
Web Summary : प्रभास की 'द राजा साब' हॉरर-कॉमेडी सिनेमाघरों में असफल रही। डिजिटल अधिकार जियोहॉटस्टार के पास हैं। नुकसान की भरपाई के लिए ओटीटी रिलीज 27 फरवरी या 6 मार्च, 2026 के आसपास होने की उम्मीद है। आधिकारिक घोषणा का इंतजार है।