साऊथमध्ये सिनेमा आणि हिरोंची क्रेझ प्रचंड आहे. आपल्या आवडत्या हिरोचा सिनेमा पाहण्यासाठी चाहते वाटेल ते करायला तयार असतात. साऊथमध्ये तर चाहते आपल्या आवडत्या कलाकारावर भरभरुन प्रेम करतात. अशाच एका सुपरस्टारचा शेवटचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली आहे. इतकी की सिनेमाच्या तिकिटाचे दर तब्बल २ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. थलपती विजयच्या 'जन नायकन' सिनेमासाठी चाहते वाट्टेल तेवढे पैसे मोजायला तयार आहेत.
थलपती विजयने काही दिवसांपूर्वीच अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली. ३३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्दीनंतर त्याने अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. राजकारणाकडे संपूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी थलपती विजयने अभिनयातून निवृत्त झाल्याचं सांगितलं. त्यामुळे 'जन नायकन' हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरणार आहे. हा सिनेमा येत्या ९ जानेवारीला प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून चाहत्यांनी रिलीजआधीच शो हाऊसफूल केले आहेत.
थलपती विजयच्या 'जन नायकन' सिनेमाच्या एका तिकिटासाठी चाहत्यांना १८०० ते २००० इतके पैसे मोजावे लागत आहे. प्रदर्शनाच्या दिवशी 'जन नायकन'चे सकाळी ६.३० वाजल्यापासूनचे शो आहेत. केवळ देशातच नाही तर जगभरात थलपती विजयच्या या सिनेमाची क्रेझ आहे. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमधून देशात ७ कोटी तर जगभरात ३५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
Web Summary : Thalapathy Vijay's last film, 'Jan Nayakan', sees ticket prices skyrocketing to ₹2000. Fans globally are eager, booking shows in advance. The film has already earned ₹7 crore in India and ₹35 crore worldwide through advance sales. Vijay retires to focus on politics.
Web Summary : थलपति विजय की आखिरी फिल्म 'जन नायकान' के टिकट की कीमतें ₹2000 तक पहुंची। दुनिया भर के प्रशंसक उत्सुक हैं, पहले से शो बुक कर रहे हैं। फिल्म ने पहले से ही भारत में ₹7 करोड़ और दुनिया भर में ₹35 करोड़ की कमाई कर ली है। विजय राजनीति पर ध्यान केंद्रित करने के लिए सेवानिवृत्त हुए।