Join us

टीव्ही अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, घरात आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 12:02 IST

कलाविश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली.

कलाविश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली. गेल्या काही दिवसापासून सिनेसृष्टीतून दुःखद बातमी समोर येत आहेत. दरम्यान आता आणखी एका अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही अभिनेत्री म्हणजे अपर्णा पी. नायर. ती मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक मल्याळम चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात काम केले आहे. 

अपर्णा पी. नायर करमना थाली येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली. ती ३१ वर्षांची होती. गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास तिच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळली.

त्यानंतर तिचा मृतदेह पीआरएस रुग्णालयात हलवण्यात आला. तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मृत्यूची नोंद केली असून पोलिसांनीही तिच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. तिच्या मृत्यूचे वृत्त ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.