Join us  

रजनीकांत यांचा बहुचर्चित 'लाल सलाम' आता हिंदीत, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 3:11 PM

हिंदी रसिकांनाही 'लाल सलाम' पाहता यावा यासाठी आता हा चित्रपट हिंदी भाषेत रिलीज होणार आहे. 

दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टार अर्थात रजनीकांत (rajinikanth) यांच्या अभिनयाविषयी आणि लोकप्रियतेविषयी काही वेगळं सांगायला नको. आपल्या सिनेमात घेण्यासाठी दिग्दर्शक, निर्माते कायम त्यांच्या दारापुढे रांग लावत असतात. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. नुकताच त्यांचा 'लाल सलाम' हा सिनेमा रिलीज झाला. हिंदी रसिकांनाही 'लाल सलाम' पाहता यावा यासाठी आता हा चित्रपट हिंदी भाषेत रिलीज होणार आहे. 

येत्या २४ मे २०२४ ला हिंदी भाषेत  'लाल सलाम' हा चित्रपट रिलीज होणार आहे काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांच  'लाल सलाम' तमिळ भाषेत प्रदर्शित झाला आणि अल्पावधीतच बॅाक्स ऑफिसवर धडाकेबाज बिझनेस केला. चित्रपटाची कथा मोईद्दीन भाईच्या जीवनासंबंधीत आहे.  'लाल सलाम'मधील रजनीकांत यांची भूमिका परिवर्तनकारी आणि प्रेरणादायक असून, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. 'लाल सलाम' या सिनेमाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या हिने केलं असून या सिनेमात अभिनेता कॅमियो रोलमध्ये झळकले आहेत. 

रजनीकांत यांचा आगामी 'लाल सलाम' हा सिनेमा स्पोर्ट्सशी निगडीत आहे. यामध्ये अभिनेते रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसत आहेत.  याशिवाय विष्णू विशाल आणि विक्रांतही सिनेमात झळकले आहेत. लाइका प्रोडक्शनच्या सुबास्करन अल्लिराजाह हे या सिनेमाचे निर्माते आहेत. रजनीकांत यांचा या सिनेमात ३० ते ४० मिनिटांचा रोल असून यासाठी त्यांनी अव्वाच्या सव्वा मानधन घेतलं आहे. 'ट्रॅक टॉलिवूड. कॉम'च्या माहितीनुसार, रजनीकांत यांनी या सिनेमामध्ये एका मिनिटांसाठी तब्बल १ कोटी रुपये चार्ज केले आहेत. 

टॅग्स :रजनीकांतसेलिब्रिटीTollywoodबॉलिवूड