Join us

मन अन् डोकं सुन्न करणारा अनुभव; OTT वरील 'हा' सस्पेन्स थ्रिलर सिनेमा दृश्यमला देतो टक्कर, तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:52 IST

दमदार स्क्रीनप्ले, जबरदस्त अभिनय अन् रोमांचक कथा!OTT वरील सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पाहून दृश्यम विसराल 

OTT Cinema : सध्या ओटीटीवर एकापेक्षा एक,वेगवेगळ्या जॉनरचे,सिनेमे-सीरीज धुमाकूळ घालताना पाहायाला मिळतात.जेव्हा सस्पेन्स-थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपटांचा उल्लेख केला जातो तेव्हा प्रेक्षकांच्या मनात सर्वात आधी दक्षिणेतील चित्रपटांचा विचार येतो. त्यामुळे आजकाल ओटीटीवर या चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळतेय. असाच एक दमदार कथेवर आधारित सिनेमा पाहून दृश्यम विसरून जाणार एवढं मात्र नक्की.या चित्रपटाचं नाव महाराजा आहे. या चित्रपटाची कथा इतकी खिळवून ठेवणारी आहे की ती तुम्ही २ तास २१ मिनिटे तुमच्या जागेवरून हलणारच नाही.

साऊथ सुपरस्टार विजय सेथूपतीची मुख्य भूमिका असलेला महाराजा चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं होत.विजय सेथुपतीच्या 'महाराजा' सिनेमात विजयने महाराजा या व्यक्तीची भूमिका साकारलीय. महाराजा हा पेशाने न्हावी असतो.महाराजाला लक्ष्मीचा शोध आहे. ही लक्ष्मी नेमकी कोण आहे,याचा उलगडा सिनेमा पाहून होईल.'महाराजा' सिनेमा अनुराग कश्यपने सुद्धा महत्वाची भूमिका साकारलीय.या चित्रपटात जबरदस्त ट्विस्ट आहेत. हा सिनेमा अनुभवण्याचा प्रकार आहे.तसंच कथानकाला देण्यात आलेला भावनिक टच हादरवून टाकेल. 

'महाराचा' चित्रपटाचं प्रेक्षकांसह समीक्षकांनीही तितकंच कौतुक केलं. थिएटरपासून ते ओटीटीपर्यंत हा एक  सर्वाधिक पाहिला जाणारा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट  ठरला आहे. इतकंच  नाहीतर IMDb कडून त्याला ८.४/१० असे  रेटिंग मिळालं आहे.१२ जुलै रोजी हा बहुचर्चित चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. 

टॅग्स :Tollywoodसिनेमा