दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक असलेले शंकर आपल्या ड्रीम प्रोजेक्टची तयारी करत आहेत . 'वेलपारी' असं सिनेमाचं नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमात साउथ हिरो धनुष दिसणार आहे. दरम्यान दिग्दर्शक शंकर यांनी दुसरा हिरो बॉलिवूडमधून घेण्याचं ठरवलं आहे. आता धनुषसोबत बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता सेकंड लीड रोल करणार आहे. कोण आहे तो?
दिग्दर्शक शंकर यांनी 'इंडियन','नायक: द रिअल हिरो','अन्नियन' असे अनेक दमदार सिनेमे बनवले आहेत. मात्र त्यांचे मागील दोन सिनेमे 'गेम चेंजर' आणि 'इंडियन २' बॉक्सऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकली नाहीत. आता ते आपल्या ड्रीम प्रोजेक्ट 'वेलपारी'वर लवकरच काम सुरु करत आहेत. याची गोष्ट त्यांनी लॉकडाऊनमध्येच लिहिली होती. आधी सिनेमात धनुषचं नाव समोर आलं. मात्र यामध्ये आणखी एका मुख्य अभिनेत्याची गरज आहे. हा अभिनेताही बडा असावा अशी त्यांची इच्छा आहे. सुरुवातीला रणवीर सिंहच्या नावाची चर्चा झाली. मात्र आता विकी कौशलच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक शंकर हे विकी कौशलच्या 'छावा'मधील अभिनयामुळे प्रभावित झाले आहेत.
'वेलपारी'साठी धनुषचं नाव जवळपास कन्फर्म आहे. त्याच्याकडून दोन वर्षांचा वेळ आणि कॉल शीट मागवली आहे. यानंतरच त्याची भूमिका कन्फर्म होणार आहे. वेलपारी हा मोठा प्रोजेक्ट आहे. अशा प्रोजेक्टवर काम करण्यासाठी दिग्दर्शक शंकर ओळखले जातात. वेलपारीची कथा एका कादंबरीवर आधारित आहे. सु वेंकटेशन यांनी ती लिहिली आहे ज्याचं नाव 'वीरा युग नायकन वेल पारी' असं आहे. इसवी सन पूर्व ते तिसऱ्या शताब्दी इसवीपर्यंतच्या बॅकड्रॉप सिनेमाची कहाणी आहे. परंबू नाडूचे परोपकारी सरदार वेलपारीची ही गोष्ट आहे. हे तेच आहेत ज्यांनी चेरा चोला आणि पांड्या राजांची विरोध केला होता. वेलपारी यांचं धाडस, पर्यावरणाप्रती असलेली आत्मियता, राजांच्या विरोधात युद्ध असं सगळं आहे.
दिग्दर्शक शंकर यांचा आधीचा सिनेमा गेम चेंजर होता ज्यामध्ये अभिनेता राम चरण मुख्य भूमिकेत होता. त्याच्यासोबत कियारा अडवाणी दिसली होती. मात्र प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला नाही. आता धनुष आणि विकी कौशल एकत्र पडद्यावर आले तर काय धमाल येईल याची सर्वांना उत्सुकता आहे.
Web Summary : Director Shankar's 'Velpari' stars Dhanush, with Vicky Kaushal possibly joining. The film, based on a novel about Velpari, a chieftain who resisted ancient kings, promises action and environmental themes. Shankar seeks two years of Dhanush's time for this grand project.
Web Summary : निर्देशक शंकर की 'वेलपारी' में धनुष मुख्य भूमिका में, विक्की कौशल भी शामिल हो सकते हैं। यह फिल्म वेलपारी नामक सरदार पर आधारित है, जिन्होंने प्राचीन राजाओं का विरोध किया था। फिल्म में एक्शन और पर्यावरण के विषय शामिल हैं। शंकर को इस परियोजना के लिए धनुष के दो साल चाहिए।