Join us

फुकटात करायचा चित्रपटात काम, बायकोचा एक टोमणा अन् आता भरघोस मानधन घेतो 'हा' सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 16:23 IST

सुपरस्टारने भर पत्रकार परिषदेतच सांगितला पत्नीने दिलेला टोमणा, एकच हशा पिकला

साऊथ स्टार चियान विक्रम (Chiyan Vikram)  'तंगलान' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतंच सिनेमासंबंधी मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्याने त्याच्या एकंदर प्रवासाविषयी चर्चा केली. या चर्चेत त्याने खुलासा करत सांगितले की त्याने अनेक सिनेमे हे फुकटात केले आहेत. हे सांगताना त्याने पत्नीचा एक किस्साही सांगितला. जो ऐकून एकच हशा पिकला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत विक्रमसोबत सहकलाकार पार्वती थिरुवोथु आणि दिग्दर्शक पा रंजीतही उपस्थित होते. यावेळी विक्रम म्हणाला की त्याने आतापर्यंत केलेल्या सर्व भूमिकांमध्ये तंगलान मधील भूमिका सर्वात महत्वाची आहे. हा सिनेमा नेहमीच त्याच्या जवळचा असेल. जास्त काळ जगलो तर हा सिनेमा मी माझ्या नातवांनाही दाखवू इच्छितो असं तो म्हणाला. तसंच त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनविषयी तो गंमतीत म्हणाला की हा तर पैशांचा खेळ आहे. मग पुढे म्हणाला, "खरं सांगायचं तर मी करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये फुकटात काम केलं. तेव्हा मी हे इतकं गांभीर्याने घेत नव्हतो. मग एक दिवस माझ्या पत्नीने मला फोन करुन सांगितलं की आम्हाला टेबलवर अन्न हवं आहे. त्यानंतर मग मी सिनेमासाठी भरघोस फी घ्यायला लागलो."

तंगलान हा साऊथचा सिनेमा कोलार गोल्ड फील्ड्सची खरी कहाणी सांगणारा आहे. इंग्रजांनी कशा पद्धतीने या गोल्ड फील्ड्सची लूट केली हे सिनेमात दाखवण्यात आलं आहे. रंजीत यांनी दिग्दर्शित केलेला या सिनेमा १५ ऑगस्ट रोजी रिलीज झाला. सध्या कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलुगु भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित झाला आहे. तर ६ सप्टेंबर रोजी सिनेमा हिंदी भाषेत देशभरात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात चियान विक्रम, पार्वती थिरुवोथु आणि मालविका मोहनन मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीसिनेमा