Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्याच्या पत्नी अन् मुलांचा तरी विचार कर...", तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 10:44 IST

"मला तृषा अजिबात आवडत नाही, कारण ती...", काय म्हणाली गायिका?

दाक्षिणात्य गायिका सुचित्राने काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तृषा कृष्णनला 'पॅरासाईट' असं संबोधलं होतं. आता थलापती विजयच्या शपथविधी सोहळ्याला तृषाची उपस्थिती पाहून सुचित्राने पुन्हा तिच्यावर निशाणा साधला आहे. तृषा यशस्वी लोकांच्या आयुष्यात शिरकाव करते, असा खळबळजनक आरोप तिने केला आहे. थलापती विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या शपथविधी सोहळ्याला तृषाची उपस्थिती आणि विजयच्या कुटुंबाची अनुपस्थिती यावरून सुचित्राने आता थेट विजयच्या पत्नीच्या आणि मुलांच्या भावनेचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

सुचित्राने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत थलापती विजयवरही निशाणा साधला आहे. तिने लिहिले की, "घटस्फोट न घेताच विजय तृषासोबत सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. संगीताने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचे आरोप केले आहेत. विजय आपल्या चाहत्यांसमोर एक चुकीचे उदाहरण ठेवत आहेत. या कठीण काळात विजयची पत्नी संगीता आणि मुलांच्या मानसिक स्थितीचा विचार तरी करा."

शिवाय एका मुलाखतीत सुचित्रा म्हणाली, "मला तृषा अजिबात आवडत नाही. मी हे अगदी वस्तुनिष्ठपणे सांगत आहे आणि माझ्या या आवडीनिवडीचा परिणाम मी माझ्या निर्णयावर होऊ देणार नाही. मला विजय आवडतो. मी कोणत्याही पक्षाची बाजू न घेता माझे मत प्रामाणिकपणे मांडेन."

विशेष म्हणजे, यापूर्वी सुचित्राने विजय आणि तृषाची बाजू घेतली होती. जेव्हा हे दोघे एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकत्र दिसले होते, तेव्हा सुचित्राने त्यांना पाठिंबा दिला होता. "दोन कलाकार मित्र म्हणून एकत्र फिरू शकत नाहीत का? लोक त्यांना जोडपे का मानत आहेत?" असा सवाल तिने तेव्हा केला होता. मात्र, आता अवघ्या काही दिवसांत सुचित्राने आपली भूमिका पूर्णपणे बदलली असून तिने तृषा आणि विजयवर कडक शब्दांत टीका करण्यास सुरुवात केली आहे.

थलापती विजयच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे दिसत आहे. एप्रिल २०२६ मध्ये विजयची पत्नी संगीता सोरनलिंगम यांनी चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात त्यांनी विजयवर एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. १९९९ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याचा २७ वर्षांचा संसार आता मोडण्याच्या वाटेवर आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Singer slams Trisha Krishnan, considers Vijay's wife and children.

Web Summary : Singer Suchitra criticizes Trisha Krishnan's presence at Vijay's event, alleging affairs and neglecting his family. She highlights Vijay's public appearances with Trisha amid divorce rumors and concerns for his family's well-being, questioning his example to fans.
टॅग्स :सेलिब्रिटीTollywoodथलपती विजय