Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा कपूरने 'पुष्पा २'ची ऑफर नाकारली! आता 'ही' अभिनेत्री करणार सिनेमात आयटम सॉंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 16:38 IST

'पुष्पा २'मधील आयटम सॉंगसाठी श्रद्धा कपूरने नकार दिला असून आता ही सुप्रसिद्ध अभिनेत्री 'पुष्पा २'मध्ये डान्स करताना दिसणार आहे (pushpa 2)

'पुष्पा २'ची सध्या खूप चर्चा आहे. 'पुष्पा २'च्या रिलीजला आता बरोबर एक महिना बाकी आहे. पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये 'पुष्पा २' रिलीज होणार आहे. 'पुष्पा'चा पहिला भाग लोकांना चांगलाच आवडला. आता दुसऱ्या भागात काय बघायला मिळणार? पुष्पाराजसमोर नवी संकटं कशी येणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. 'पुष्पा'मध्ये दिसलेला फहाद फाजिल पुष्पाराजला कशी टक्कर देणार, हेही थिएटरमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. 'पुष्पा च्या पहिल्या भागात समांथाने आयटम सॉंगमध्ये जबरदस्त डान्स केला होता. 'पुष्पा २'मध्ये श्रद्धा कपूर आयटम सॉंग करताना दिसणार अशी शक्यता होती. परंतु आता श्रद्धाने ही ऑफर नाकारली आहे. 

आता ही अभिनेत्री करणार 'पुष्पा २' मध्ये आयटम सॉंग

अभिनेत्री श्रद्धा कपूर 'पुष्पा २'मध्ये आयटम सॉंग करणार असल्याचं बोललं जात होतं. 'स्त्री २'च्या घवघवीत यशानंतर श्रद्धाची 'पुष्पा २'मध्ये खास नृत्यासाठी वर्णी लागली होती. परंतु आता श्रद्धाने 'पुष्पा २'मध्ये आयटम सॉंग करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे श्रद्धाच्या जागी सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्री श्रीलीला आयटम सॉंग करताना दिसणार आहे. साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रीलालाने महेश बाबूसोबत अलीकडेच 'गुंटूर कारम' सिनेमात 'कुरिची मदाथापेटी' गाण्यावर केलेला डान्स चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे श्रीलाला 'पुष्पा २' मध्ये अल्लू अर्जुनसोबत कशी थिरकणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

या तारखेला रिलीज होणार 'पुष्पा २'

अल्लू अर्जुनने त्याच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन 'पुष्पा २' सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. आता 'पुष्पा २'साठी प्रेक्षकांनी फक्त काही दिवसच वाट पाहावी लागणार आहे. कारण ५ डिसेंबरला अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहतेही आनंदी आहेत. लवकरच सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पुन्हा एकदा अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना, फहाद फाजिल आणि इतर कलाकार झळकणार आहेत.

 

टॅग्स :पुष्पाश्रद्धा कपूर