Join us
Daily Top 2Weekly Top 5

समांथा रुथ प्रभूचं अ‍ॅक्शन मोड ऑन, बॅक मसल्स फ्लॉन्ट करत म्हणाली - "काही वर्षांपूर्वी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 10:50 IST

साउथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Prabhu)ने तिच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांना चकीत केले आहे. दरम्यान आता तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

साउथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Prabhu) तिच्या फिटनेसने चाहत्यांना चकीत करत असते. तिची स्लिम बॉडी आणि तिची जॉ-लाइन पाहून चाहते तिच्यावर फिदा होतात. दरम्यान, आता समांथाने तिच्या पाठीच्या स्नायू दाखवणाऱ्या काही फोटोंसह एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले आहे की, एक वेळ अशी होती जेव्हा तिने अशी बॉडी बनवण्याची आशाच सोडली होती.

समांथा प्रभूने तिच्या जिम ट्रेनरसोबतचे दोन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाचे जिम वेअर परिधान केलेलं दिसत आहे. पांढरे स्नीकर्स आणि पोनीटेल हेअरस्टाइलसह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. फोटोंमध्ये ती पाठीचे स्नायू फ्लॉन्ट करताना पोझ देताना दिसत आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, ''काही वर्षांपूर्वी मी मजबूत पाठ मिळवण्याची आशा जवळजवळ सोडलीच होती. मला खरंच वाटत होतं की हे माझ्या जीन्समध्येच नाहीये. मी इतरांची चांगली पाठ पाहायची आणि विचार करायची की, 'हो, मी अशी होऊ शकत नाही.' पण माझा विचार चुकीचा होता आणि खरं सांगायचं तर, मी चुकीची ठरले याचा मला आनंद आहे. तर हो, आता मी हे दाखवणार आहे, कारण इथेपर्यंत पोहोचण्यासाठी जी मेहनत करावी लागली, ती खूप जबरदस्त होती. खूप जबरदस्त.''

''स्ट्रेंथ ट्रेनिंग तुमचा सर्वोत्तम मित्र बनतो''

समांथा पुढे म्हणाली की, ''ज्या दिवसांमध्ये माझे मन करत नव्हते, ज्या दिवसांमध्ये काहीही बदलत आहे असं वाटत नव्हते आणि जेव्हा सोडून देणे सोपे होते, त्या दिवसांमध्येही मी दाखवलं की मी हे करू शकते. मसल्स बनवणे खूप महत्वाचे आहे. केवळ तुम्ही कसे दिसता यासाठी नाही, तर तुम्ही कसे जगता, कसे चालता-फिरता आणि तुमची वाढती वये कशी होते, यासाठी देखील ते महत्त्वाचे आहे. तुमचं वय वाढतं तसतसे, स्ट्रेंथ ट्रेनिंग तुमचा सर्वोत्तम मित्र बनतो.''

''हार मानू नका...''शेवटी अभिनेत्री म्हणते, ''स्ट्रेंथ ट्रेनिंग माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरली आहे. याने मला शिस्त, संयम शिकवला आणि हे देखील शिकवलं की "जीनमध्ये नाहीये" हा फक्त एक बहाणा आहे, जोपर्यंत आपण स्वतःला चुकीचे सिद्ध करत नाही, तोपर्यंत आपण तोच वारंवार वापरत राहतो. जर तुम्ही अशा टप्प्यावर असाल जिथे तुम्ही हार मानण्याच्या जवळ आहात, तर हार मानू नका. तुम्ही पुढे जात राहिलात म्हणून, तुमच्या भविष्यातील रूपाला तुमचे खूप आभार वाटतील.''

English
हिंदी सारांश
Web Title : Samantha Ruth Prabhu flaunts back muscles, shares inspiring fitness journey.

Web Summary : Samantha Ruth Prabhu inspires fans with her fitness journey, showcasing her toned back muscles. She reveals she once doubted her ability to build such strength, emphasizing the importance of strength training for overall well-being and discipline.
टॅग्स :समांथा अक्कीनेनी