Join us
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीत मिठाचा खडा? ऋषभ शेट्टीने रुक्मिणी वसंतला केलं इन्स्टाग्रामवर अनफॉलो; नक्की काय बिनसलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:53 IST

ऋषभ शेट्टी आणि रुक्मिणी वसंत यांच्यात नक्की काय बिनसलं?

'कांतारा अ लिजेंड चॅप्टर १' हा चित्रपट जगभरात गाजला. ऋषभ शेट्टी आणि रुक्मिणी वसंत यांची मुख्य भुमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. पण, आता ऋषभ शेट्टीने सोशल मीडियावर रुक्मिणी वसंत हिला अनफॉलो केलं आहे. रुक्मिणी वसंत हिच्यासोबतच ऋषभ शेट्टीनं मित्र राज बी. शेट्टीलाही अनफॉलो केले आहे. त्यांच्या नात्यात बिनसल्याच्या चर्चा आहेत. याच नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण, चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ऋषभ शेट्टीच्या फॉलोअर्स लिस्टमध्ये रुक्मिणी वसंत आणि राज बी. शेट्टी या दोघांची नावं नसल्याने चाहत्यांच्या ही गोष्ट लक्षात आली .विशेष म्हणजे, ऋषभने 'होम्बले फिल्म्स' (Hombale Films) या प्रॉडक्शन हाऊसलाही अनफॉलो केले आहे, परंतु त्याने या संस्थेचे प्रमुख विजय किरागंदूर यांना मात्र अनफॉलो केलेले नाही. 

'कांतारा: चॅप्टर १' मध्ये रुक्मिणी वसंतने 'राणी कनकवती' ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या यशानंतर दोघांमधील मैत्रीची सर्वत्र चर्चा होती. मात्र आता अचानक ऋषभने तिला सोशल मीडियावर का अनफॉलो , याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्यात काही वैयक्तिक किंवा व्यावसायिक तणाव निर्माण झाला असावा, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, ऋषभ शेट्टी 'कांतारा'च्या प्रीक्वेलनंतर आता लवकरच 'जय हनुमान' (Jai Hanuman) या बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार आहे. तर रुक्मिणी वसंत ही प्रभाससोबत 'स्पिरिट' आणि यशसोबत 'टॉक्सिक' या चित्रपटात दिसणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rishab Shetty unfollows Rukmini Vasanth: Kantara friendship turns sour?

Web Summary : Rumors swirl as Rishab Shetty unfollows Rukmini Vasanth and Raj B. Shetty, sparking speculation about a rift after their 'Kantara' success. He also unfollowed Hombale Films. Both are pursuing new projects: Shetty with 'Jai Hanuman,' and Vasanth with 'Spirit' and 'Toxic'.
टॅग्स :ऋषभ शेट्टीकांतारा