Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही आज लग्न करत नाहीये...", विजय देवराकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर रश्मिकाने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:14 IST

रश्मिका-विजय उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार असून सिटी पॅलेसमध्ये त्यांच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचं इन्फ्लुएन्सरने म्हटलं होतं. त्यानुसार २ फेब्रुवारीला म्हणजे आज त्या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आता अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने मौन सोडलं आहे. 

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. गुपचूप साखरपुडा केल्यानंतर रश्मिका-विजय आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ते दोघेही फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नुकतंच एक व्हिडीओही समोर आला होता. त्या व्हिडीओत रश्मिका-विजय उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार असून सिटी पॅलेसमध्ये त्यांच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचं इन्फ्लुएन्सरने म्हटलं होतं. त्यानुसार २ फेब्रुवारीला म्हणजे आज त्या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आता अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने मौन सोडलं आहे. 

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या रिपोर्टनुसार, रश्मिकाने तिच्या लग्नाबद्दल बोलताना २ फेब्रुवारीला त्यांचं लग्न या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. आज ते दोघेही लग्न करणार नसल्याचं अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे २ फेब्रुवारीला रश्मिका-विजय लग्न करणार नसल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने व्हिडीओत केलेला दावा हा खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण, आता रश्मिका आणि विजय लग्नाच्या बेडीत कधी अडकणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

रश्मिका आणि विजय गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी गुपचूप साखरपुडा केला. याबाबत रश्मिकाने हिंटही दिली होती. मात्र त्यांनी अद्याप त्यांचं नातं ऑफिशियल केलेलं नाही. साखरपुड्याप्रमाणेच ते दोघे लग्नही गुपचूप करणार असल्याची माहिती आहे. फार कमी जणांना त्यांच्या लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार रश्मिका-विजय २६ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rashmika denies wedding rumors with Vijay, breaks silence at last.

Web Summary : Rashmika Mandanna refuted rumors of marrying Vijay Deverakonda on February 2nd, calling them false. While denying the speculated wedding date, the actress didn't confirm any future plans, leaving fans curious about their relationship status.
टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडा