Rashmika Mandanna-Vijay Deverakonda: रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडा नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. रश्मिका आणि विजयने उदयपूरमध्ये २६ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते. लग्नानंतर दोन दिवसांनी रश्मिका-विजयने चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे. लग्नानंतर रश्मिका आणि विजय एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे.
रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा 'राणाबली' (Ranabaali) या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये रश्मिका आणि विजयचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. विजयने धोतर घातलं आहे. तर त्याचे झुपकेदार केस आणि पिळदार मिश्यांनी लक्ष्य वेधून घेतलं आहे. तर साडी आणि दागिन्यांमध्ये रश्मिकाचा लूक दिसत आहे. या सिनेमात रश्मिका जयम्मा आणि विजय राणाबली हे पात्र साकारताना दिसणार आहेत.
'राणाबली' सिनेमा ११ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी अशा पाच भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. लग्नानंतर रश्मिका-विजयला ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. याआधी ते 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड'मध्ये एकत्र दिसले होते. 'राणाबली' सिनेमात केवळ एक प्रेमकथा नसून, तो १८ व्या शतकातील रायलसीमा भागाच्या इतिहासावर आधारित एक भव्य ऐतिहासिक थरारपट आहे. राहुल संकृत्यान दिग्दर्शित या चित्रपटात ब्रिटिश काळातील संघर्ष आणि शोषण दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात हॉलिवूड अभिनेता अरनॉल्ड वोस्लू (Arnold Vosloo) खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून, अजय-अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे.
Web Summary : Newlyweds Rashmika Mandanna and Vijay Deverakonda announced their upcoming movie 'Ranabaali'. The first poster reveals their characters: Rashmika as Jayamma and Vijay as Ranabaali. Set in the 18th century, the film portrays a historical thriller with British-era struggles, releasing in five languages on September 11.
Web Summary : नवविवाहित रश्मिका मंदाना और विजय देवरकोंडा ने अपनी आगामी फिल्म 'राणाबली' की घोषणा की। पहले पोस्टर में उनके किरदार सामने आए: रश्मिका जयम्मा के रूप में और विजय राणाबली के रूप में। 18वीं सदी में स्थापित, यह फिल्म 11 सितंबर को पांच भाषाओं में रिलीज होगी।