Join us

पहिल्या भागापेक्षा जास्त ग्रँड असणार 'पुष्पा 2', डबिंग आर्टिस्ट सांगितला कसा आहे चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 14:10 IST

'पुष्पा: द रुल' हा चित्रपट ५ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

'पुष्पा: द राइज' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला आणि आता चित्रपटाचा दूसरा भाग 'पुष्पा: द रुल' हा या वर्षी प्रदर्शित होणार आहे.  स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जूनचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  'पुष्पा: द रुल' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत.  'पुष्पा: द रुल' चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

'पुष्पा: द रुल' हा चित्रपट ५ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रिलीजच्या एक महिना आधी डबिंग आर्टिस्टने सिनेमाविषयी अनेक मोठे खुलासे केले आहेत. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल'चे बजेट 500 कोटी रुपये आहे. पहिल्या भागापेक्षा हा चित्रपट मोठ्या स्तरावर तयार करण्यात आला आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना, फहाद फाजीलसह अनेक स्टार्स यात दिसणार आहेत. अलीकडेच डबिंग आर्टिस्टने सांगितले, "हा सिनेमा पहिल्या भागापेक्षा जास्त भव्य असेल".

नुकताच 123 तेलुगु डॉट कॉम वर एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यातून पोस्ट प्रॉडक्शनचे काम सर्व भाषांमध्ये सुरू असल्याची माहिती समोर आली. अल्लू अर्जुन याचा केरळमध्ये मोठा चाहता वर्ग आहे, त्यामुळे हा चित्रपट या राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणार आहे. लोकप्रिय डबिंग कलाकार जीस जॉय मल्याळम आवृत्तीसाठी डबिंग करत आहे. त्यांनी सांगितले की, "'पुष्पा 2' च्या मल्याळम आवृत्तीचे फर्स्ट हाफ डबिंग 4 दिवसांत पूर्ण केले. तर उरलेल्या भागाचे लवकरच पुर्ण होईल. सिनेमात अल्लू अर्जुन आणि फहादचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळणार आहे. उत्तम पटकथा, गाणी, छायांकन आणि सुकुमारचे दिग्दर्शन ही सिनेमाची प्रमुख वैशिष्ट्ये असतील". हे अपडेट ऐकल्यानंतर चाहत्यांना आनंद झाला आहे. आता चाहते आता पुष्पाराज पाहण्यासाठी आसुसले आहेत.

टॅग्स :अल्लू अर्जुनTollywood