Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पुष्पा 2' च्या सेटवर अल्लु अर्जुनला दुखापत, काही दिवसांसाठी शूट थांबलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 09:18 IST

चाहते अल्लु अर्जुनच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.

साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2'ची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. 'झुकेगा नही साला','पुष्पा: फ्लावर नही फायर है मै' अशा डायलॉगने प्रेक्षकांना शिट्टया वाजवायला भाग पाडणारा अल्लु अर्जुन 'पुष्पा 2' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच सेटवरुन एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. अल्लु अर्जुनला शुटिंगदरम्यान दुखापत झाली असून शूट काही दिवसांसाठी पोस्टपोन करण्यात आलं आहे. 

'पुष्पा 2-द रुल' पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार आहे. प्रेक्षकांमध्ये आतापासूनच सिनेमाबद्दल क्रेझ पाहायला मिळत आहे. चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर दुसऱ्या भागाकडून साहजिकच प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत. माध्यम रिपोर्टनुसार, एक फाईट सिक्वेन्स शूट करत असताना अल्लुच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे डॉक्टर्सने सध्या त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सिनेमाचं शूट सुरु होईल अशी शक्यता आहे. 

चाहते अल्लु अर्जुनच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. 'पुष्पा:द रुल' मध्ये अल्लु अर्जुनसह रश्मिका मंदाना, प्रकाश राज, जगपति बाबू, अनुसूया भारद्वाज मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अल्लु अर्जुनला नुकताच 'पुष्पा'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यामुळे हा सिनेमा नक्कीच त्याच्यासाठी खास आहे. 

टॅग्स :अल्लू अर्जुनसिनेमा