Join us  

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा पुष्पा' गाण्याचा प्रोमो प्रदर्शित, तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 6:10 PM

'पुष्पा 2 द रुल'चं पहिलं गाणं 'पुष्पा पुष्पा' चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.  

गेल्या अनेक दिवसांपासून अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. पुष्पा : द राइज'  या पहिल्याच भागातून अल्लू अर्जुनने आपल्या हटके स्टाईलने चाहत्यांना प्रेमात पाडलं. आता काही दिवसांपुर्वीच  'पुष्पा 2 द रुल'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यातच पुन्हा 'पुष्पा 2' सिनेमा ट्रेंड करतोय. 'पुष्पा 2 द रुल'चं पहिलं गाणं 'पुष्पा पुष्पा' चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.  

निर्मात्यांनी 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटामधील  'पुष्पा पुष्पा गाण्याची एक झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. अल्लू अर्जुननं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पहिल्या सिंगल 'पुष्पा पुष्पा' गाण्याचा प्रोमो प्रदर्शित केला आहे.  गाण्याची फक्त झलक पाहूनच चाहते प्रचंड खुश झाले आहेत. प्रोमो प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हे संपुर्ण गाणं येत्या 1 मेला प्रदर्शित होणार आहे. प्रोमा पाहिल्यानंतर चाहत्यांना आता संपुर्ण गाण्याची उत्सुकता लागली आहे. 

पुष्पा: द राइज हा सिनेमा 17 डिसेंबर 2017ला रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. कोरोनाच्या काळात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक होता.  'पुष्पा फ्लावर नही फायर है मे' हा त्याचा डायलॉग प्रचंड गाजला. तसंच सिनेमातील गाणी, अल्लू अर्जुनची स्टाईल, रश्मिकासोबतची केमिस्ट्री, अॅक्शन सीन्स सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. सिनेमातील 'श्रीवल्ली',  'सामी-सामी' आणि  'उ अंटावा' या गाण्यांनी सगळ्यांची मने जिंकली. 

'पुष्पा 2' बद्दल सांगायचं तर भारतीय मनोरंजन विश्वातील हा एक बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. गेल्या २ वर्षांपासून 'पुष्पा 2' ची उत्कंठा शिगेला आहे. अल्लू अर्जुन सिनेमात पुष्पाच्या प्रमुख भुमिकेत झळकणार आहे. तर रश्मिका श्रीवल्लीच्या भुमिकेत दिसणार आहे. याशिवाय फहाद फाजिल सिनेमात पोलीस अधिकारी भवरच्या भूमिकेत पुन्हा भाव खाऊन जाईल यात शंका नाही. समांथा रुथ प्रभू देखील चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्तचीही खास भूमिका असण्याची शक्यता आहे.  'पुष्पा 2' सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणार आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनसेलिब्रिटीबॉलिवूडTollywood