'पुष्पा २' सिनेमा काल ५ डिसेंबरला जगभरात रिलीज झाला. 'पुष्पा २'रिलीज झाला आणि सिनेमा पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती पैसे कमावतो याकडे सर्वांचं लक्ष होतं. अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाचा हा सिनेमा वर्षभरापासून चर्चेत होता. अशातच सिनेमाच्या रिलीजआधी टीझर, ट्रेलर, गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. याचाच परिणाम 'पुष्पा २'च्या बॉक्स ऑफिसवर झालेला दिसून येतो. 'पुष्पा २'ने पहिल्याच दिवशी ऐतिहासीक कमाई केलीय.
'पुष्पा 2'ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
बॉक्स ऑफिस रिपोर्टकडे नजर टाकल्यास 'पुष्पा २'ने ओपनिंग डेला तब्बल १६५ कोटींची कमाई केलीय. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा २' सिनेमाने रिलीजच्या आदल्या दिवसापासून म्हणजेच ४ डिसेंबरपासून रात्री उशीर सिनेमाचे शो आयोजित केले होते. रात्री उशीरा सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी चांगली गर्दी केली आणि सिनेमाला १०.१ कोटींचा फायदा झाला. त्यामुळे ही कमाई पण जोडल्यास 'पुष्पा २'ने पहिल्याच दिवशी तब्बल १७५ कोटींची कमाई केलीय.
'पुष्पा २'ने मोडला या सिनेमांचा विक्रम
पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई करणारा 'पुष्पा २'आता पहिला भारतीय सिनेमा बनलाय ज्याने ओपनिंग डेला इतकी तगडी कमाई केलीय. 'पुष्पा 2'ने राजामौलींच्या RRR सिनेमाचा विक्रम यामुळे मोडलाय. RRR ने पहिल्या दिवशी १५६ कोटींची कमाई केलेली. त्यामुळे 'पुष्पा २' ओपनिंग डेच्या कमाईच्या बाबतीत RRR च्या पुढे गेलाय. आजवर कोणत्याही बॉलिवूड सिनेमालाही 'पुष्पा २' इतकी कमाई करता आली नाही. 'पुष्पा 2'च्या हिंदी वर्जनलाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद आहे. "ये तो बस शुरुआत है", 'पुष्पा २' पुढील दिवसांमध्ये किती कमाई करतो, याची सर्वांना उत्सुकता आहे.