दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या आपल्या आगामी 'फौजी' (Fauji) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, नुकतेच या चित्रपटाच्या सेटवरील काही महत्त्वाचे फोटो सोशल मीडियावर 'लीक' झाले असून ते तुफान व्हायरल होत आहेत. ही बाब निर्मात्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संताप व्यक्त केलाय. तसेच फोटो व्हायरल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा ईशारा त्यांनी दिला आहे.
'फौजी' चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक करणाऱ्यांना कडक शब्दांत ताकीद देण्यात आली आहे. "काही अकाऊंट्स 'फौजी'च्या सेटवरील लीक झालेले फोटो पसरवत आहेत. हा आमचा अंतिम इशारा समजा, कोणीही हा लीक कंटेंट शेअर करू नये. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल", असे निर्मात्यांनी स्पष्ट केले. फोटो लीक झाल्यामुळे चित्रपटाच्या भव्यतेवर आणि प्रेक्षकांच्या अनुभवावर नकारात्मक परिणाम होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
चित्रपटाचे दिग्दर्शक हनु राघवपुडी यांनीही प्रेक्षकांना नम्र विनंती केली आहे. ते म्हणाले, "आम्ही तुम्हाला काहीतरी खास देण्यासाठी जीव ओतून काम करत आहोत. कृपया फोटो पसरवून ती जादू खराब करू नका. थिएटरमध्येच याचा खरा अनुभव घेऊया".
'फौजी' या चित्रपटात प्रभाससोबत इमानवी मुख्य भूमिकेत पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात जया प्रदा आणि मिथुन चक्रवर्ती यांसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्माते हा चित्रपट यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. प्रभासचा नुकताच प्रदर्शित झालेला 'द राजा साब' बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही, त्यामुळे आता 'फौजी'कडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. याव्यतिरिक्त प्रभासचे 'कल्की २' आणि 'सालार २' सारखे मोठे चित्रपटही प्रदर्शनाच्या रांगेत आहेत.
Web Summary : Prabhas' upcoming film 'Fauji' faces controversy as set photos leak online. Producers threaten legal action against those spreading the images, fearing it will negatively impact the viewing experience. Director Hanu Raghavapudi requests fans not to spoil the film's magic.
Web Summary : प्रभास की आगामी फिल्म 'फौजी' विवादों में घिर गई है क्योंकि सेट की तस्वीरें ऑनलाइन लीक हो गई हैं। निर्माताओं ने तस्वीरें फैलाने वालों के खिलाफ कानूनी कार्रवाई की धमकी दी है, उन्हें डर है कि इससे देखने के अनुभव पर नकारात्मक प्रभाव पड़ेगा। निर्देशक हनु राघवपुडी ने प्रशंसकों से फिल्म का जादू खराब न करने का अनुरोध किया है।