बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ॲक्शन-मायथोलॉजिकल चित्रपट 'कांतारा चॅप्टर १' अखेर दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादानंतर 'कांतारा'च्या सीक्वलची प्रेक्षकांना प्रतीक्षा होती. अखेर सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
'कांतारा चॅप्टर १'ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिस धमाका केला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर १'ने प्रदर्शनाच्या दिवशी ६० कोटी कमावले. आता येत्या वीकेंडला हा सिनेमा किती कमाई करतो, हे पाहणं रंजनकारक असणार आहे.
'कांतारा: चॅप्टर १' हा कर्नाटकमधील कदंब काळावर आधारित आहे. कदंब हे कर्नाटकाच्या काही भागांचे महत्त्वाचे शासक होते आणि त्यांनी या क्षेत्राच्या वास्तुकला आणि संस्कृतीला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तो काळ भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ मानला जातो. २०२३ मध्ये, ऋषभ शेट्टीने घोषणा केली होती की, प्रेक्षकांनी जो चित्रपट पाहिला तो खरं तर भाग २ होता आणि त्यामुळे पुढे जो प्रदर्शित होईल तो 'कांतारा'चा प्रीक्वल असेल. 'कांतारा: चॅप्टर १' हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Web Summary : 'Kantara Chapter 1' released to packed theaters, earning ₹60 crore on its opening day. The film explores Karnataka's Kadamba dynasty, a golden age shaping architecture and culture. This prequel promises an enthralling cinematic experience.
Web Summary : 'कांतारा चैप्टर 1' दर्शकों से भरे सिनेमाघरों में रिलीज हुई, पहले दिन ₹60 करोड़ कमाए। फिल्म कर्नाटक के कदंब राजवंश की पड़ताल करती है, जो वास्तुकला और संस्कृति को आकार देने वाला एक सुनहरा युग था। यह प्रीक्वल एक रोमांचक सिनेमाई अनुभव का वादा करता है।