Join us

प्रसिद्ध अभिनेत्याचं कारवरील नियंत्रण सुटलं, जोडप्याला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 16:55 IST

अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Kannada Actor Arrest : कन्नड अभिनेता नागाभूषण संकटात सापडला आहे. अभिनेत्याने फुटपाथवर चालत असलेल्या जोडप्याला धडक मारली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला असून पुरुष गंभीर जखमी झाला आहे. नागाभूषणवर कारवाई होत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या कन्नड अभिनेता चांगलाच अडचणीत सापडलाय.

पोलिसांच्या तपासानुसार, ५८ वर्षीय कृष्णा बी आणि ४८ वर्षीय प्रेमा एस फुटपाथवर चालत होते. तर अभिनेता नागाभूषण उत्तराहाली ते कोनानकुनते असा प्रवास करत होता. तो स्वत: गाडी चालवत होता मात्र त्याचा बॅलन्स सुटला. त्याने आधी फुटपाथवरील जोडप्याला धडक दिली आणि नंतर तो एका इलेक्ट्रिक खांबावर जाऊन आदळला. बेजबाबदारपणे गाडी चालवल्यानेच ही जीवितहानी झाली.

त्या जोडप्याला लगेच दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. सध्या कृष्णा बी यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरुनच अभिनेत्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

अभिनेता नागाभूषण सिनेमांमध्ये तसा नवीनच आहे. तो विनोदी भूमिकांसाठी ओळखला जातो. 'हनीमून','होप','मेड इन चायना' सारख्या सिनेमात त्याने काम केले आहे. तो सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असून त्याचे ७१ हजार फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :अपघातसेलिब्रिटीमृत्यूअटक