मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि निर्माते दिलीप राज यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण कन्नड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली असून चाहते आणि सहकलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
चित्रपटसृष्टीला मोठा धक्का
दिलीप राज यांच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेते डोडन्ना यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. डोडन्ना म्हणाले की, दिलीप राज यांचे वडील एच.एम. शिवरुद्रप्पा आणि माझे भाऊ सोबत शिकले होते. दिलीपचे जाणे आमच्यासाठी मुलाला गमावण्यासारखे आहे, या बातमीने मला मोठा धक्का बसला आहे. दिलीप राज यांनी केवळ चित्रपटातच नव्हे, तर नाटक, डबिंग आणि टीव्ही विश्वातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
'मिलन', 'यू-टर्न', 'ऑर्केस्ट्रा मैसूर', 'बॉयफ्रेंड' आणि 'लव मॉकटेल ३' यांसारख्या चित्रपटांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. 'मिलन' चित्रपटात दिलीप यांनी दिवंगत सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्यासोबत त्यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका प्रचंड गाजली होती. ते कन्नड टीव्हीवरील एक लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी 'हिटलर कल्याणा', 'रंगोली', 'कुमकुम भाग्य', 'मंगल्या' आणि 'जननी' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. 'हिटलर कल्याणा'मधील त्यांच्या भूमिकेने त्यांना घराघरात प्रसिद्धी मिळवून दिली.
अभिनयासोबतच त्यांनी 'डीआर क्रिएशन्स' (DR Creations) या आपल्या बॅनरखाली 'पारू', 'ना निन्ना बिदलारे' आणि 'कृष्णा रुक्कू' यांसारख्या मालिकांची यशस्वी निर्मिती केली होती. दिलीप राज यांनी अनेक रिअॅलिटी शोजचे सूत्रसंचालनही केले होते. एक हरहुन्नरी कलाकार आणि यशस्वी निर्माता गमावल्यामुळे कन्नड कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.
Web Summary : Kannada actor and producer Dileep Raj passed away at 48 due to a heart attack. Known for roles in 'Milan' and 'Hitler Kalyana', his death shocked the Kannada film industry. He also produced successful TV series.
Web Summary : कन्नड़ अभिनेता और निर्माता दिलीप राज का 48 वर्ष की आयु में दिल का दौरा पड़ने से निधन हो गया। 'मिलन' और 'हिटलर कल्याण' में अपनी भूमिकाओं के लिए जाने जाने वाले, उनके निधन से कन्नड़ फिल्म उद्योग में शोक की लहर है। उन्होंने सफल टीवी धारावाहिकों का भी निर्माण किया।