दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या दुलकर सलमानची गणना केवळ साऊथमध्येच नव्हे, तर पॅन-इंडिया स्तरावरच्या स्टार्समध्ये होते. त्याने प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'लकी भास्कर' चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली होती. आज दुलकर सलमानचा एक नवा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जर तुम्ही उत्कृष्ट कथा, अप्रतिम अभिनय अनुभवू इच्छित असाल, तर दुलकर सलमानचा हा चित्रपट आवर्जून पाहायलाच हवा. प्रदर्शित होताच, या चित्रपटाला प्रेक्षकांची जोरदार पसंती मिळत आहे.
त्या चित्रपटाचं नाव आहे 'कांथा'. दुलकर सलमानचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कांथा' आज १४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. या चित्रपटाला नेटिझन्सकडून चांगली पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. दुलकर सलमानची 'वेल्फेअर फिल्म्स' आणि राणा दग्गुबातीची 'स्पिरिट मीडिया' यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात राणा दग्गुबाती, समुथिरकानी आणि भाग्यश्री बोरसे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
विशेष म्हणजे या चित्रपटात दुलकर सलमानसोबत मराठमोळी भाग्यश्री बोरसे झळकली आहे. भाग्यश्रीचा जन्म १९९९ साली छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला. भाग्यश्रीच्या जन्मानंतर काही वर्षात तिचं कुटुंब नायजेरियाला शिफ्ट झालं. तिथे तिच्या वडिलांना चांगली नोकरी मिळाली. नायजेरियातील 'लेगोज'शहरात तिने शालेय शिक्षण घेतलं. सात वर्ष नायजेरियात राहिल्यानंतर ती मुंबईत आली. इथे तिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. शिक्षण घेतानाच ती मॉडेलिंगही करत होती. तिचा कॅमेरा प्रेझेन्स चांगला असल्याने अनेकांनी तिला अभिनय क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. भाग्यश्रीने काही जाहिरातींमध्ये काम केलं. नंतर ती बॉलिवूडमध्ये आली. भाग्यश्रीने 'यारियां' आणि 'चंदू चॅम्पियन' मध्ये काम केलं आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?'कांथा' चित्रपटाची कथा १९५० च्या दशकातील आहे. सिनेसृष्टीतील अहंकार, मैत्री, प्रेम आणि सर्जनशील स्वातंत्र्याच्या संघर्षावर आधारित ही कथा एक अनुभवी दिग्दर्शक 'अय्या' आणि एक उगवता सुपरस्टार 'टी. के. महादेवन' या दोन महत्वाच्या व्यक्तिरेखांभोवती फिरते. या चित्रपटात दुलकर सलमानने 'टी. के. महादेवन' ही महत्वाची भूमिका साकारली आहे. तर समुथिरकानी यांनी 'अय्या' या व्यक्तिरेखेतून एक प्रभावी भूमिका ताकदीने उभी केली आहे.
Web Summary : Dulquer Salmaan's 'Kaantha,' co-starring Bhagayshree Borse, is receiving positive reviews. Set in the 1950s, the film explores ego, friendship, and creative freedom within the film industry, focusing on a director and a rising star.
Web Summary : दुलकर सलमान की 'कांथा', जिसमें भाग्यश्री बोरसे भी हैं, को सकारात्मक समीक्षा मिल रही है। 1950 के दशक में स्थापित, फिल्म फिल्म उद्योग के भीतर अहंकार, दोस्ती और रचनात्मक स्वतंत्रता की पड़ताल करती है।