Join us  

'हनुमान'चं शुटिंग कुठे झालं माहितीये का? महाराष्ट्राच्या अगदी जवळ आहे हे ठिकाण; तुम्हीही देऊ शकता भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 3:34 PM

HanuMan: 'हनुमान' या सिनेमातील लोकेशन अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. घनदाट जंगल, उंच डोंगर, शांत वातावरण हे सगळं डोळे दिपावणार आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर आणि कलाविश्वात एकाच सिनेमाची चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे 'हनुमान' (HanuMan). तेजा सज्जा (Teja Sajja) याची मुख्य भूमिका असेलला हा तेलुगू सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. आतापर्यंत या सिनेमाने तब्बल ११५ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा सगळ्याच बाजूने परफेक्ट ठरत असल्यामुळे प्रेक्षकवर्ग आपोआप त्याच्याकडे खेचला जात आहे. या सिनेमाचं कथानक, कलाकारांचा अभिनय यांच्यासोबतच आणखी एक गोष्ट चर्चिली जात आहे ती म्हणजे या सिनेमातील लोकेशन. त्यामुळे हे लोकेशन नेमकं कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते प्रयत्न करत आहेत.

'हनुमान' या सिनेमातील लोकेशन अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. घनदाट जंगल, उंच डोंगर, शांत वातावरण हे सगळं डोळे दिपावणार आहे. त्यामुळे हे खरंखुरं लोकेशन आहे की व्हिफएक्सच्या मदतीने उभं करण्यात आलं आहे. असा प्रश्न प्रेक्षक उपस्थित करत आहेत. मात्र, हे लोकेशन खरंखुरं असून भारतामध्येच ते असून या ठिकाणी कोणीही सहज भेट देऊ शकतं.

कुठे आहे नेमकं हे ठिकाण?हनुमान या सिनेमाचं चित्रीकरण आंध्र प्रदेशमधील पडेरु आणि मारेडुमिली या ठिकाणी झालं आहे. हे ठिकाण खासकरुन येथील दाट झाडी आणि निसर्गरम्य वातावरण यासाठीच ओळखलं जातं. तसंच या सिनेमासाठी AI टूल ChatGPT आणि  Midjourney यांचाही वापर करण्यात आलेला आहे. याविषयी सिनेमाचे दिग्दर्शक Prasanth Vema यांनीच हा खुलासा केला आहे.

Maredumilli हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. वन विभागाने या क्षेत्राला इको-टुरिझ्म डेस्टिनेशन म्हणून घोषित केलं आहे. हे ठिकाण लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असून येथे  जलतरंगिनी वॉटर फॉल, अमृतधारा वॉटर फॉल, मान्यम व्यूपॉइंट, सोकुलेरु व्यूपॉइंट, भूपतिपलेम जलाशय आणि रम्पा फॉल्स यांसारखी ठिकाण आहेत.

सिनेमातील हनुमानाची मुर्ती आहे खरी?

या सिनेमात हनुमानाची भव्यदिव्य अशी उंच मुर्ती दाखवण्यात आली आहे. मात्र, ही मुर्ती खरीखुरी नसून किंवा स्टॅच्यू नसून ती व्हिज्युअल इफेक्टच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे.

दरम्यान, या सिनेमाचं चित्रीकरण करण्यासाठी १३० दिवसांचा कालावधी लागला. या सिनेमात जास्तीत जास्त AI टुल्सचा वापर करण्यात आला आहे. या सिनेमातील अॅक्शन सीन आणि गाण्याचं चित्रीकरण सप्टेंबर २०२१ मध्ये मारेडुमिली आणि पडेरु येथे झालं आहे. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीसिनेमाआंध्र प्रदेशगोळीबार