दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती, अदिती राव हैदरी आणि अरविंद स्वामी यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित 'गांधी टॉक्स' अखेर डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे. ३० जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आपल्या आगळ्यावेगळ्या सादरीकरणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता हा चित्रपट घरबसल्या पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मूकपट आहे.
'गांधी टॉक्स' हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ पासून ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) वर स्ट्रीम झाला आहे. सध्या हा चित्रपट 'रेंटल' (भाड्याने) तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजेच, प्राइम सदस्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, दोन आठवड्यांनंतर हा चित्रपट नियमित कॅटलॉगमध्ये जोडला जाईल, त्यानंतर सदस्य कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तो पाहू शकतील.
मूकपट असल्याने या चित्रपटात संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. २ तास १३ मिनिटांच्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. दिग्दर्शकाने या चित्रपटात महात्मा गांधींची प्रतिमा असलेल्या चलनी नोटेचा वापर अत्यंत कल्पकतेने केला आहे. ही नोट कधी आशेचा किरण ठरते, तर कधी भ्रष्टाचाराचे प्रतीक. मानवी लोभ आणि जगण्यासाठी चाललेली धडपड यावर हा चित्रपट भाष्य करतो.
कलाकारांची मांदियाळी
'गांधी टॉक्स'मध्ये विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी हे दाक्षिणात्य सिनेविश्वातील मेगास्टार आहेत, तसेच बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अदिती राव हैदरी एका महत्वाच्या भूमिकेत आहे. या तिघांसह अभिनेता सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. रोहिणी हट्टंगडी, उषा नाडकर्णी, महेश मांजरेकर, प्रियदर्शिनी इंदलकर, वनिता खरात, निलेश दिवेकर असे अनेक आघाडीचे मराठी कलाकार 'गांधी टॉक्स'मध्ये आहेत.
Web Summary : Vijay Sethupathi's silent film 'Gandhi Talks,' also starring Aditi Rao Hydari and Arvind Swami, is now streaming on Amazon Prime Video (rental). The film explores human greed using Mahatma Gandhi's image on currency notes. Marathi actors also feature.
Web Summary : विजय सेतुपति की मूक फिल्म 'गांधी टॉक्स', जिसमें अदिति राव हैदरी और अरविंद स्वामी भी हैं, अब अमेज़ॅन प्राइम वीडियो (किराए पर) पर स्ट्रीमिंग हो रही है। फिल्म महात्मा गांधी की छवि का उपयोग करके मानव लालच की पड़ताल करती है। मराठी अभिनेता भी शामिल हैं।