साऊथ अभिनेता सूर्या आणि तृषा कृष्णन त्यांच्या आगामी 'करुप्पू' या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर लाँच इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमधील सूर्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. स्टेजवर फोटो काढण्यासाठी आलेल्या एका चाहत्यासोबत केलेल्या कृतीमुळे सूर्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
या इव्हेंटमध्ये सूर्याचा एक चाहता अभिनेत्यासोबत सेल्फी काढण्यासाठी थेट स्टेजवर आला आणि त्याने सूर्याचे पायच धरले. त्यानंतर तिथे असलेल्या बाऊन्सरने त्याला उचलून बाजूला नेलं. पण, तेव्हाच सूर्याने त्याला सोडण्याची विनंती केली. बाऊन्सरने सोडल्यानंतर त्या चाहत्याने सूर्यासोबत स्टेजवरच सेल्फी घेतला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते सूर्याचं कौतुक करत आहेत.
दरम्यान, 'करुप्पू' या सिनेमात सूर्या आणि तृषा कृष्णन मुख्य भूमिकेत आहेत. हा एक कोर्टरुम ड्रामा असून येत्या १४ मे रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. याआधी सूर्या आणि तृषा आरू आणि मौनम पेसियाधे या सिनेमात एकत्र दिसले होते. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी ते दोघे पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत.
Web Summary : South actor Surya's humility is winning hearts. A fan touched his feet onstage during a trailer launch. While security intervened, Surya requested they allow the fan to take a selfie with him. Surya and Trisha are starring in 'Karuppu', releasing on May 14, reuniting after 21 years.
Web Summary : अभिनेता सूर्या की विनम्रता ने जीता दिल। ट्रेलर लॉन्च के दौरान एक फैन ने मंच पर उनके पैर छुए। सुरक्षाकर्मियों ने हस्तक्षेप किया, लेकिन सूर्या ने उनसे अनुरोध किया कि वे फैन को उनके साथ सेल्फी लेने दें। सूर्या और त्रिशा 'करुप्पु' में हैं, जो 14 मई को रिलीज हो रही है, 21 साल बाद फिर से साथ काम कर रहे हैं।