Join us

सस्पेंन्स असा की डोक्याचा होईल भुगा! २ तास १५ मिनिटांच्या 'या' सिनेमाची OTT वर जोरदार चर्चा, तुम्ही बघितला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 15:16 IST

सस्पेंन्स असा की डोक्याचा होईल भुगा!२ तास १५ मिनिटांच्या 'या' सिनेमाची ओटीटीवर सर्वाधिक चर्चा, त्याचं नाव...

OTT Trending Film: प्रत्येक आठवड्याला ओटीटीवर अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात.पण,त्यापैकी काहीच सर्वांच्या मनात घर करतात.सध्या डिजीटल प्लॅटफॉर्ममुळे दग अगदीच जवळ आलं आहे. नानाविध कलाकृती या माध्यमातून लोकांना उपलब्ध झाल्या आहेत. अलिकडेच ओटीटीवर अनेक उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ज्यामध्ये अॅक्शन, हॉरर आणि थ्रिलर सिनेमे यांचा समावेश आहे. असाच एक चित्रपट ज्याने बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता ओटीटीवरही ट्रेंडिंग आहे. अॅक्शन सीन्सच्या बाबतीत हा चित्रपट बागी-४ ला टक्कर देणारा आहे, असं अनेकाचं म्हणणं आहे. त्याचं नाव  'द 100' असं आहे.

अ‍ॅक्शन आणि थ्रिलरने भरलेल्या 'द 100'या चित्रपटाला टॉप १० च्या यादीत स्थान मिळवलं आहे.हा चित्रपट तुम्ही अगदी घरबसल्या पाहू शकता.'द १००' हा एक तेलुगू चित्रपट आहे. 'द १००' ११ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि आता ओटीटीवरही चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.या क्राइम थ्रिलर चित्रपटाला आयएमडीबीनेही चांगले रेटिंग दिले आहे. हा अॅक्शन, सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट पाहून झोप उडाल्याशिवाय राहणार नाही.या चित्रपटात तुम्हाला मिशा नारंगा, सागर आणि धन्या बालकृष्ण या दाक्षिणात्य कलाकारांच्या भूमिका आहेत.

कथानक आहे इन्ट्रेंस्टिंग

दरम्यान, द-१०० सिनेमाचं कथानक एका आयपीएस अधिकाऱ्याच्या भोवती फिरते. हा धाडसी अधिकारी शहरातील दरोडेखोरांचा शोध घेण्याची सुरुवात करतो. याचदरम्यान, त्याची आरती नावाच्या एका महिलेसोबत भेट होते. त्यानंतर कथानकाला नवं वळण येतं. यानंतर, तुम्हाला चित्रपटात ट्विस्ट आणि टर्न्स दिसतील.हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे.  राघव ओंकार शशिधर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शिवाय चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन, सस्पेन्स आणि थ्रिलर पाहायला मिळेल. चित्रपटात प्रत्येक वळणावर तुम्हाला नवीन ट्विस्ट पाहायला मिळतील.

टॅग्स :Tollywoodसिनेमा