साऊथ सिनेसृष्टीत सध्या सनई चौघडे वाजत आहेत. नुकतंच रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी पारंपरिक पद्धतीने लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. त्यानंतर आता साऊथ ब्युटी अनुष्का शेट्टीच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. अनुष्का शेट्टी ४४व्या वर्षी लग्नगाठ बांधणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, अनुष्का शेट्टी बंगळुरूमधील एका बिजनेसमॅनसोबत लग्न करणार आहे. तिचा होणारा नवरा कोण आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अनुष्का शेट्टी अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न करणार असल्याचंही समोर आलं आहे. अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी ऐकताच चाहतेही खूश झाले आहेत. चाहते अनुष्काच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र अद्याप अनुष्काने तिच्या लग्नाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
अनुष्का शेट्टीला 'बाहुबली' या सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली होती. या सिनेमात तिने देवसेना ही भूमिका साकारली होती. या सिनेमात अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत होता. सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर अनुष्का शेट्टीचं नाव प्रभाससोबत जोडलं गेलं होतं. त्यांच्या लग्नाच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र मैत्री सोडून इतर कुठलंच नातं नसल्याचं अभिनेत्रीने स्पष्ट केलं होतं. अनुष्काने अनेक साऊथ सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'अरुंधती', 'सिंघम', 'लिंगा', 'साहो', 'वेदम' अशा सिनेमांमध्ये ती दिसली होती. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'घाटी' सिनेमात अनुष्काने अॅक्शन सीन्सही केले होते.
Web Summary : After Rashmika and Vijay's marriage, reports suggest Anushka Shetty, 44, will marry a Bangalore-based businessman in an arranged marriage. Details about the groom are awaited, and fans are excited, though Anushka hasn't confirmed the news. She is known for Baahubali and other South Indian films.
Web Summary : रश्मिका और विजय की शादी के बाद, खबरें हैं कि अनुष्का शेट्टी, 44, बेंगलुरु के एक व्यवसायी से अरेंज मैरिज करेंगी। दूल्हे के बारे में जानकारी का इंतजार है, और प्रशंसक उत्साहित हैं, हालांकि अनुष्का ने अभी तक खबर की पुष्टि नहीं की है। वह बाहुबली और अन्य दक्षिण भारतीय फिल्मों के लिए जानी जाती हैं।