Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 14:32 IST

पुष्पा म्हणतो "माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनने लेकाबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या आगामी 'पुष्पा २' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच अल्लू अर्जुनने त्याच्या लेकाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या लेकाची तुलना अॅनिमलमधील रणबीर कपूरच्या भूमिकेसोबत केली आहे. "माझा मुलगा अॅनिमलमधील रणबीर कपूरसारखा आहे", असं अल्लू अर्जुन म्हणाला आहे. 

अल्लू अर्जुनने नुकतीच बालकृष्ण यांच्या 'अनस्टॉपेबल विथ एनबीके' या शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत रणबीर कपूरबद्दल बोलताना अल्लू अर्जुनने अॅनिमल फेम अभिनेत्याचं कौतुक केलं. या शोमध्ये त्याला रणबीर कपूरचा फोटो दाखविण्यात आला. "रणबीर कपूरबद्दल तू काय विचार करतोस?" असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. याबद्दल बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला, "या पिढीतील चांगल्या अभिनेत्यांपैकी रणबीर एक आहे. माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी तो एक आहे. तो मला आवडतो". यानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या लेकाची तुलना अॅनिमलमधील रणबीर कपूरच्या रणविजय सिंगच्या पात्राशी केली. 

"स्नेहा रेड्डीशी लग्न करण्याआधी कुणाला डेट केलं होतं का?" असा प्रश्न अल्लू अर्जुनला विचारण्यात आला. याचं उत्तर देताना तो म्हणाला, "माझी मुलंदेखील हा शो बघतील. मी माझ्या मुलांना सांगितलं आहे की माझं फक्त त्यांच्या आईवरच प्रेम आहे. आणि म्हणूनच मी तिच्याबरोबर लग्न केलं आहे. तो अॅनिमलमधील रणबीर कपूरसारखा आहे. तो माझ्यासाठी काहीही करू शकतो. पण, जर मी त्याच्या आईबरोबर काही चुकीचं केलं तर तो मलादेखील सोडणार नाही".

दरम्यान, अल्लू अर्जुनचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'पुष्पा २' सिनेमा ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रश्मिका मंदानाही मुख्य भूमिकेत आहे. 'पुष्पा'नंतर चाहते त्याच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत होते. अखेर 'पुष्पा २' चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पाTollywood