सध्या अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या 'पुष्पा २' (Pushpa 2 Movie) चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यापूर्वीच अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. पुष्पा २ हा सर्वात जलद १००० कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पुष्पा २ बॉक्स ऑफिसवर ज्या प्रकारे धुमाकूळ घालत आहे, निर्मात्यांनी या फ्रँचायझीचा आणखी एक चित्रपट आणण्याचा निर्णय घेतला आहे. अल्लू अर्जुनने दिल्लीतील पुष्पा २ च्या सक्सेस संमेलनादरम्यान पुष्पा ३च्या चर्चेला दुजोरा दिला आहे. आता अल्लू अर्जुनने तिसऱ्या भागाची टॅगलाइन काय असेल याचा खुलासा केला आहे.
पुष्पाच्या दोन्ही भागांमध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसली आहे. तर फहाद फासिल हा खलनायक म्हणून समोर आला आहे. प्रत्येकजण सुकुमारच्या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. दरम्यान आता अल्लू अर्जुनने पुष्पा ३ची टॅगलाइन काय असेल, हे सांगितले आहे. पुष्पा १ ची टॅगलाइन झुकेगा नही साला होती. त्यानंतर आता सीक्वल आला आहे, त्याची टॅगलाइन हरगीज नही झुकेगा साला अशी आहे. आता जेव्हा अल्लू अर्जुनला तिसऱ्या भागाच्या टॅगलाइनबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने 'अब रुकेगा नहीं साला' असे म्हटले. अल्लू अर्जुनच्या या वक्तव्यामुळे तिसरा भाग येणार असल्याची पुष्टी झाली आहे.
चाहत्यांच्या प्रेमाची अभिनेत्याने केली प्रशंसाअल्लू अर्जुनने पुष्पा २ च्या रेकॉर्डब्रेक यशाबद्दल देखील सांगितले. चित्रपटाचे आकडे प्रभावी आहेत, परंतु अभिनेत्याने यावर जोर दिला की सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाहत्यांचे प्रेम आणि समर्थन. तो म्हणाला, "आकडे तात्पुरती आहे, पण प्रेम माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. मी नेहमी म्हणतो की रेकॉर्ड तोडण्यासाठी असतात. कदाचित पुढील २-३ महिने मी या यशाचा आनंद घेईन, परंतु उन्हाळ्यापर्यंत असावे आणि हा रेकॉर्ड पुढील चित्रपट मोडेल, असे मला वाटते.