Dulquer Salmaan And Pooja Hegde Movie: 'सीता रामम' आणि 'लकी भास्कर' सारख्या तेलुगू चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे दुलकर सलमान. मळ्यालम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नायकांपैकी तो एक आहे. सध्या सर्वत्र दुलकर सलमानच्या आगामी 'DQ41' सिनेमाची तुफान चर्चा आहे. लवकरच तो नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच या चित्रपटासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. दुलकर सलमानच्या बहुप्रतिक्षित 'DQ41' चित्रपटात पूजा हेगडेची एन्ट्री झाली आहे. तब्बल तीन वर्षांनंतर पूजा टॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या जोडीला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील प्रचंड उत्सुक आहेत.
नुकतीच 'SLV Cinemas' द्वारे पूजा हेगडे 'DQ41' चित्रपटाचा भाग असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पूजा अतिशय साध्या अंदाजात दिसत आहे. मेकर्सनी व्हिडिओसोबत लिहिलंय की, “मनमोहक @hegdepooja हिचे #DQ41 मध्ये स्वागत. DQ आणि पूजेची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर जादुई ठरेल. आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणि अपडेट्सची वाट पाहा." अशी माहिती त्यांनी सिनेरसिकांना दिली आहे.
हा चित्रपट दिग्दर्शक रवी नेलाकुडिटी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत आहे आणि SLV सिनेमाजद्वारे निर्मित होत आहे. सिनेमात पूजाच्या एन्ट्रीमुळे तिचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत आणि आता प्रेक्षक दुलकर आणि पूजेची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी उत्सुक आहेत.'DQ41'हा पूजा हेगडेच्या आगामी चित्रपटांच्या यादीतील एक महत्त्वाच्या प्रोजेक्टपैंकी एक आहे. याशिवाय ती वरुण धवनसोबत है जवानी तो इश्क होना है या चित्रपटातही दिसणार आहे.तसेच ही अभिनेत्री जना नायकन आणि सूर्या 44 यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.