'धुरंधर द रिव्हेंज' सिनेमाने प्रदर्शित होताच अख्खं मार्केटच खाऊन टाकलं आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'धुरंधर २' रोज नवा रेकॉर्ड बनवत आहे. आदित्य धरच्या सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत असतानाच एका साऊथ सिनेमाची चर्चा रंगली आहे. कमी बजेटमध्ये बनलेला हा साऊथ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बिग बजेट असलेल्या 'धुरंधर २'ला चांगलीच टक्कर देत असल्याचं दिसत आहे. सगळीकडे 'धुरंधर २'ची हवा असताना बॉक्स ऑफिसवर मात्र साऊथ सिनेमाने कोटींच्या घरात कमाई केली आहे.
'धुरंधर २'ला 'आडू ३' हा सिनेमा चांगलीच टक्कर देत आहे. अवघ्या २० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने अवघ्या सात दिवसांतच सिनेमाचं बजेटही वसूल केलं आहे. धुरंधर बरोबरच १९ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. केवळ देशातच नाही तर जगभरातही हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आत्तापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वर्ल्ड वाइड तब्बल ८९ कोटींचा गल्ला जमवला आहे. सगळीकडे धुरंधर २ ची चर्चा असताना 'आडू ३' सिनेमाला चांगले शोज मिळत आहेत.
तर 'धुरंधर २' या स्पाय-थ्रिलरने चित्रपटाने अवघ्या ६ दिवसांत अनेक बिग बजेट चित्रपटांचे 'लाईफटाईम कलेक्शन'ला मागे टाकलं आहे. भारतातील ग्रॉस कमाई ६८७.४३ कोटींवर पोहोचली असून निव्वळ (नेट) कमाई ५७५.६७ कोटी इतकी झाली आहे. परदेशात या चित्रपटाने आतापर्यंत २३१.५७ कोटींची ग्रॉस कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाची एकूण जागतिक (वर्ल्डवाइड) कमाई ९१९ कोटींवर पोहोचली आहे.
Web Summary : Despite 'Dhurandhar 2's' dominance, the low-budget South Indian film 'Aadu 3' is giving tough competition, earning ₹89 crore worldwide in just seven days. 'Dhurandhar 2' earned ₹919 crore globally.
Web Summary : 'धुरंधर 2' के दबदबे के बावजूद, कम बजट वाली साउथ इंडियन फिल्म 'आडू 3' कड़ी टक्कर दे रही है, जिसने सिर्फ सात दिनों में दुनिया भर में ₹89 करोड़ कमाए। 'धुरंधर 2' ने विश्व स्तर पर ₹919 करोड़ कमाए।