Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कसाब जिथे होता तिथेच मलाही...", सूरज पांचोलीने सांगितला अंडा सेलमधला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:18 IST

तुरुंगातील अनुभव सांगताना म्हणाला...

प्रसिद्ध अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली (Sooraj Pancholi) चर्चेत आहे. 'केसरी वीर' सिनेमातून त्याने कमबॅक केलं आहे. काही वर्षांपूर्वी जिया खान आत्महत्येप्रकरणी तो चर्चेत होता. त्यानेच जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप होता. यामुळे त्या तुरुंगातही जावं लागलं होतं. वयाच्या २१ व्या वर्षी त्याला तुरुंगवास भोगावा लागला. त्याच्या करिअरवरही परिणाम झाला. काही महिन्यांपूर्वीच त्याची या केसमधून निर्दोष मुक्तता झाली. आता 'केसरी वीर' सिनेमाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतीत त्याने तुरुंगातला अनुभव सांगितला.

अभिनेता सूरज पांचोलीने नुकतीच हिंदी रशला मुलाखत दिली. यावेळी तो तुरुंगातील अनुभव सांगताना म्हणाला, "आता सगळं थोडं अंधुक आठवतंय. मी तेव्हा फक्त २१ वर्षांचा होतो. मला आर्थर रोड तुरुंगात पाठवलं गेलं आणि अंडा सेलमध्ये ठेवलं होतं. मी त्याच सेलमध्ये होतो जिथे कसाबला ठेवण्यात आलं होतं. मी जसं काय बॉम्बब्लास्ट केला आहे अशी मला वागणूक मिळायची."

तो पुढे म्हणाला, "झोपताना डोक्याखाली साधी उशीही नव्हती. मी पेपर टाकून त्यावर झोपायचो. मी फारच मोठा गुन्हा केला आहे असे माझ्यासोबत सगळे वागायचे. मी काही फार चढवून सांगत नाहीये. मी तिथे कसे दिवस काढले याची चार-पाच वर्षांनंतर मला जाणीव झाली. हे सगळं स्वप्नात घडतंय असंच मला वाटायचं. सीबीआय चौकशीही झाली. तो खूप कठीण काळ होता."

२०१३ साली अभिनेत्री जिया खानने गळफास घेत आत्महत्या केली. त्याआधी जिया आणि सूरज रिलेशनशिपमध्ये होते. ती प्रेग्नंटही होती अशी चर्चा झाली. जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा सूरजवर आरोप होता. त्याला अटक झाली. २२ दिवस तो तुरुंगात राहिला आणि नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. 

टॅग्स :सुरज पांचोलीबॉलिवूडआर्थररोड कारागृह