Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षी सिन्हा-जहीरने २ वर्षांपूर्वीच गुपचूप केला होता साखरपुडा? लग्नानंतर फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 08:49 IST

लग्नानंतर आता सोनाक्षीच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. सोनाक्षीने दोन वर्षांपूर्वीच जहीरबरोबर साखरपुडा केल्याचं म्हटलं जात आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सोनाक्षी आणि जहीरने रजिस्टर पद्धतीने कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत रविवारी(२३ जून) विवाह केला. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, आता मात्र सोनाक्षीच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. सोनाक्षीने दोन वर्षांपूर्वीच जहीरबरोबर साखरपुडा केल्याचं म्हटलं जात आहे. 

सोनाक्षीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये तिच्या हातात अंगठी दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचा हा फोटो शेअर केला होता. यामध्ये तिने हातातील हिऱ्याची अंगठी फ्लॉन्ट केली होती. या फोटोत सोनाक्षीच्या बाजूला एक व्यक्ती उभी असल्याचं दिसत होतं. पण, या व्यक्तीचा चेहरा फोटोत दिसत नव्हता. ती व्यक्ती कोण आहे, हे तिने गुलदस्त्यात ठेवलं होतं. हा फोटो शेअर करत सोनाक्षीने "हा माझ्यासाठी मोठा दिवस आहे. माझं एक मोठं स्वप्न पूर्ण होत आहे. आणि तुमच्याबरोबर हे शेअर करण्यापासून मी स्वत:ला रोखू शकले नाही", असं म्हटलं होतं. 

सोनाक्षीच्या या फोटोतील अंगठी आणि लग्नाच्या फोटोंमध्ये तिने घातलेली अंगठी ही सारखीच आहे. त्यामुळे सोनाक्षी आणि जहीरने दोन वर्षांपूर्वीच साखरपुडा केला होता, असं म्हटलं जात आहे. सोनाक्षीबरोबर त्या फोटोमध्ये जहीरच असल्याचंदेखील चाहते म्हणत आहेत. 

दरम्यान, सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांनी लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. सोनाक्षीप्रमाणेच जहीरदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयाबरोबरच तो मॉडेलिंगदेखील करतो. सोनाक्षी आणि जहीरने डबल XL सिनेमात एकत्र काम केलं होतं. जहीरचे वडील व्यावसायिक असून त्याचे सलमान खानशीही मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हासेलिब्रेटी वेडिंगजहीर इक्बाल