Join us

कपल गोल्स! सोनमसाठी आनंद आहुजानेही लग्नानंतर बदललं आपलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 15:30 IST

लग्नानंतर माझ्या नवऱ्याने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी मला नाव बदलण्याची सक्ती केली नव्हती.

मुंबई: काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपती आनंद आहुजा यांचा विवाहसोहळा मुंबईत पार पडला होता. त्यानंतर सोनम कान सोहळ्यासाठी पॅरिसमध्ये गेली होती. याठिकाणी रेड कार्पेटवर सोनमने परिधान केलेल्या कपड्यांची बरीच चर्चाही झाली. परंतु, या सर्व धामधुमीत अनेक चाहत्यांना सोनम आणि आनंदबाबतची एक गोष्ट लक्षात आली नाही.सोनमने लग्नानंतर लगेचच म्हणजे 8 मे रोजी ट्विटर अकाऊंटवर आपले नाव बदलले होते. सोनम कपूरऐवजी तिने आपले नाव सोनम के आहुजा असे केले. पण सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला तो आनंद आहुजा यानेही आपले नाव बदलल्यानंतर. ही गोष्ट समजल्यानंतर अनेकांनी आनंदचे इन्स्टाग्राम अकाऊंट बघितले. तेव्हा आनंदने खरोखरच आपले नाव बदलल्याचे दिसले. त्याने आपले आनंद आहुजा हे नाव बदलून आनंद के आहुजा असे केले आहे. साहजिकच सोशल मीडियावर या सगळ्याची बरीच चर्चाही झाली. मात्र, सोनमने आपण कोणाच्याही सांगण्यावरून स्वत:चे नाव बदलल्याचे स्पष्ट केले. मी स्त्रीवादी असल्याचे नेहमीच सांगत आले आहे. त्यामुळे मी स्वत:च्या भूमिकेवर ठाम असते. लग्नानंतर माझ्या नवऱ्याने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी मला नाव बदलण्याची सक्ती केली नव्हती. मी स्वत:हूनच हा निर्णय घेतला. माझ्या नवऱ्यानेही स्वत:च्याच मर्जीने त्याचे इन्स्टाग्रामवरील नाव बदलल्याचे सोनमने सांगितले. 

टॅग्स :सोनम कपूरबॉलिवूडसोशल व्हायरल