बॉलीवूडची सोज्वळ ब्युटी क्वीन सोनाली बेंद्रे ही मराठमोळी आहे, हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अगं बाई अरेच्चा या चित्रपटातील ‘छम छम करता हैं’ या गाण्यामध्ये तिने ठुमके लावले खरे, पण सोनालीला मराठी चित्रपटात अभिनय करताना पाहण्याचे भाग्य तर तिच्या चाहत्यांना अजून तरी मिळाले नाही. मग म्हणतात ना दुधाची तहान काही वेळेस ताकावर भागवावी लागते, असे काही तिच्या चाहत्यांना सध्या म्हणावे लागेल. कारण सोनाली आता मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. सोनालीचा पारंपरिक अस्सल ठसकेबाज मराठमोळ्या लूकमधील एक फोटो सोशल साइटवर व्हायरल होत आहे. या फोटोला तिच्या चाहत्यांकडूनदेखील अॅप्रिसिएट केले जातेय. लाल रंगाच्या घागऱ्यामध्ये सोनाली एकदम स्टनिंग दिसत आहे. कानात झुमके, गळ्यात साज, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, बिंदी, हातात बांगड्या अशा पारंपरिक वेषात सजलेली सोनाली खूपच सुंदर दिसत आहे. लवकरच ती आपल्याला मराठी चित्रपटात दिसावी, अशी आपण आशा करू या.
सोनालीचा मराठमोळा लूक
By admin | Updated: March 28, 2016 00:28 IST