Join us

सोनालीला सुनीलसोबत करायचेय काम

By admin | Updated: November 14, 2016 03:30 IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या चतुरस्र अभिनयामुळे ओळखली जाते. मराठी आणि बॉलिवूडमध्ये सतत दजेर्दार भूमिका साकारून सोनालीने

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या चतुरस्र अभिनयामुळे ओळखली जाते. मराठी आणि बॉलिवूडमध्ये सतत दजेर्दार भूमिका साकारून सोनालीने तिचे चित्रपटसृष्टीतील स्थान बळकट केले आहे. सोनालीने अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत आजपर्यंत चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु, सोनालीला कोणासोबत काम करण्याची इच्छा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? सोनालीला सुनील बर्वेसोबत काम करायची इच्छा आहे. सोनालीने नुकतेच याविषयी सोशल मीडियावर सांगितले आहे. सोनाली लिहिते की, मला सुनीलसोबत काम करण्याची इच्छा आहे आणि मी त्यासाठी चांगल्या संधीच्या शोधात आहे. आता सोनालीने सुनीलसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे म्हटल्यावर नक्कीच आपल्याला ही नवीन जोडी मोठ्या पडद्यावर दिसूही शकते. आता सोनालीची ही इच्छा कधी पूर्ण होतेय, याच्या प्रतीक्षेत तर तिचे चाहतेही नक्कीच असतील. याविषयी सुनील काय म्हणतोय, हे अजून तरी समजलेले नाही. परंतु, सोनालीसारख्या अभिनेत्रीसोबत जर सुनीलला काम करण्याची संधी मिळाली, तर नक्कीच त्यालाही आनंद होईल.