प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतेच एक फोटोसेशन खास लोकेशनवर जाऊन केले आहे. तिने नुकताच तिच्या हटके अदेमधील दिलखेचक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तिचा हा फोटो एकदमच झक्कास दिसत आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाइट असलेला तिचा फोटो सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. तिच्या फोटो सेशनसाठी तिने फोटोग्राफर तेजस नेरूरकरचे आभारदेखील मानले आहेत. अशा या तिच्या सुंदर फोटोला सोशल मीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहेत. सोनालीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. हिंदी आणि मराठी अशा अनेक चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.
सोनालीची हटके अदा
By admin | Updated: February 17, 2017 00:04 IST